Breaking News

रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या, किटच्या अभ्यासासाठी चार जणांची समिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. विविध कंपन्यांनी उत्पादीत केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला दहा दिवसात शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, प्रा. डॉ. अमिता जोशी हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत. यासंदर्भात काल आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

समितीची कार्य असे राहील-

· आयसीएमआरने रॅपीड ॲण्टी बॉडी चाचण्यांसाठी शिफारस केलेल्या विविध चाचणी प्रणाली, किट यांचा अभ्यास करून त्यापैकी सर्वच अथवा निवडक चाचणी प्रणालीचा आणि किटचा राज्यात वापर करण्याची शिफरस करणे.

· या चाचण्या पोलिस, आरोग्य सेवेशी निगडीत संवर्ग, स्वच्छता कामगार, तसेच सामान्य जनता यांच्यावर करायच्या की निवडक संवर्गावर करावयाrapid च्या याबाबत शिफारस करावी.

· शिफारस केलेल्या चाचण्या व किटच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वारस्य (EOI) मसुदा तयार करून आरोग्य विभागाला सादर करायचा आहे.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *