Breaking News

Tag Archives: thane

आता शिवाजी महाराज हॉस्पीटलमधील मृत्यूप्रकरणी आरोग्यमंत्र्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला आता शिवाजी महाराज हॉस्पीटलमधील १८ मृत्यूचा अहवाल २५ तारखेपर्यंत सादर करा

ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथील रुग्णालयात शनिवार १२ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते रविवार १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८.३० वा. या १० तासांच्या कालावधीत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेची योग्य ती चौकशी करून पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी शिफारस व …

Read More »

आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, रुग्णांच्या जीवाशी झालेली हेळसांड अजिबात खपवून घेतली जाणार नाही दोन दिवसात अहवाल तयार करून दोषींवर कारवाई करणार

ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या कळवा-कोपर येथील रुग्णालयात जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. अश्याप्रकारे रुग्णाच्या जीवाशी झालेली हेळसांड आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, येत्या दोन दिवसात या प्रकरणाचा अहवाल येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा सवाल,… की गरीब माणसं फक्त मरण्यासाठी जन्माला येतात? छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल

कोपर-कळवा रुग्णालयात कालपासून तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू ओढवल्यामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांबरोबरच मनसे नेते अभिजित जाधव व ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयात प्रशासनाला जाब विचारला. यावेळी रुग्णालयात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही रुग्णालयात दाखल झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना जितेंद्र …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंच्या अधिपत्याखालील महापालिकेच्या रूग्णालयातील मृत्यू प्रकरणाची चौकशी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची चौकशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकिय अधिपत्याखालील ठाणे महापालिकेवर त्यांच्याच गटाची सत्ता आहे. ठाणे येथील कोपर मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू झाला. सदर मृत्यू प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ राम बारोट यांनी १७ जणांच्या मृत्यूला त्यांची प्रकृती अवस्थ असल्याचे सांगत प्रशासनाची बाजू लावून धरली …

Read More »

शरद पवार यांची ठाणे महापालिका हॉस्पीटल प्रशासनाला कानपिचक्या ५ मृत्यूच्या घटनेनंतरही प्रशासनाला जाग न येणं दुर्दैवी

ठाणे शहर हे तसे पाह्यला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात कोणती विकास कामे व्हावी आणि कोणती प्रलंबित ठेवायची याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीनेच होत आहे. त्यातच ठाणे महानगरपालिकेवरही मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाचीच सत्ता आहे. पण काही दिवसांपूर्वी येथील महापालिका रूग्णालयात ५ जणांचा मृत्यू …

Read More »

ठाणे महापालिकेच्या शिवाजी महाराज रूग्णालयात एकाच रात्रीत १७ रूग्णांचा मृत्यू रूग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित

उपचाराअभावी ठाणे पालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता मागील २४ तासात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला. मृत्यू पावलेल्या रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणले होते. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र २४ तासांत इतके मृत्यू झाल्याने पालिका रुग्णालयाच्या …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे आवाहन, सुनो द्रोपदी….. मणिपूरवरून पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती, राज्यपालांवर साधला निशाणा

मणिपूर येथील हिंसाचारावरून शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मणिपूरच्या महिला राज्यपाल आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यावर निशाणा साधला. तसेच यावेळी महिलांवर होत असलेल्या अत्याचारावरून देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनाही ठोस निर्णय घेण्याचे आवाहन करत जेव्हा परदेशात जाता तेव्हा इंडियन मुजाहिदचे प्रतिनिधीत्व करता की हिंदूस्थानचे प्रतिनिधीत्व करता असा …

Read More »

वर्षपूर्तीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात आमदारांचा श्वास गुदमरू लागला… शिवसैनिकांच्या मनातील उद्रेकाला वाचा फोडण्याचं काम केलं

राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त ठाण्यातल्या टेंभी नाका येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वर्षभरापूर्वी (महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात) शिवसेना आणि भाजपाच्या गोटात काय घडलं याबाबत बरीच माहिती उलगडून सांगितली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात राज्यातल्या जनतेचं जगणं असहाय्य …

Read More »

अजित पवार यांचा सवाल, असं काय घडलंय की १०० लोकांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ आलीय… सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची गरज काय

ठाणे जिल्ह्यात संरक्षण दिलेल्या व्यक्ती कोण कोण आणि कुठल्या क्षेत्रातील याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण माहिती द्यायला संबधित लोक तयार नाही. ठाणे जिल्हयात व शहरात १०० लोकांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. असं काय घडलंय की, १०० लोकांना संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली आहे असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी …

Read More »

ठाण्यातील वादावर मुख्यमंत्री शिंदेंचे जम्मू काश्मीरातून प्रतिक्रिया, गोष्ट फार लहान…

राज्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येऊन सत्तास्थापन केली. तसेच आगामी निवडणुका एकत्र लढण्याचेही सुतोवाच केले जात आहेत. अशातच ठाण्यात भाजपा-शिंदे गटात वादाची ठिणगी पडली. एकीकडे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला मदत न करण्याचा ठराव मंजूर केला, तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदेंनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. आता या सर्व …

Read More »