Breaking News

उद्धव ठाकरे यांचे आवाहन, सुनो द्रोपदी….. मणिपूरवरून पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती, राज्यपालांवर साधला निशाणा

मणिपूर येथील हिंसाचारावरून शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मणिपूरच्या महिला राज्यपाल आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यावर निशाणा साधला. तसेच यावेळी महिलांवर होत असलेल्या अत्याचारावरून देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनाही ठोस निर्णय घेण्याचे आवाहन करत जेव्हा परदेशात जाता तेव्हा इंडियन मुजाहिदचे प्रतिनिधीत्व करता की हिंदूस्थानचे प्रतिनिधीत्व करता असा सवाल उद्वव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संंभारीग ब्रिगेड व  उत्तर भारतीय हिंदी भाषिकांचे एक समेंलन शिवसेना (ठाकरे गट) कडून वांद्रे येथे रंगशारदा सभागहात आयोजित करण्यात आला होता. त्या समेंलनास संबोधित करताना उद्धव ठाकरे हे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपाध्याय यांची एक कविता राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना ऐकवली. तसेच मणिपूर मधील महिलांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, ३१ आणि १ तारखेला इंडिया या विरोधी आघाडीच्या नेत्यांची बैठक होत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही याच कालावधीत महाराष्ट्रात येत आहे. त्या दिवशी ते ज्यांच्यावर ७० हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यांच्यासोबत एका कार्यक्रमाला हजर राहणार आहे. मी हुकुमशाही पध्दतीने कारभार करू इच्छिणाऱ्यांपासून आम्ही लांब गेलो हिंदूत्वापासून लांब गेलो नाही असेही निर्धारपूर्वक सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, मध्यंतरी तुम्ही उत्तर भारतीय लोक एकत्रित होतात मग आता काय झाले की तुम्ही आमच्यापासून लांब गेलात. कोरोना काळात तुमच्यासाठी मी केंद्र सरकारकडे रेल्वे मागत होतो. तुमच्या सर्व राहण्या खाण्याची तयारी केली. सांगा तुम्हाला काय कमी पडू दिलं. पण ऐन निवडणूका आल्या की, कोणी तरी तुमच्या गावाकडून आणला जातो आणि तुमच्याकडे सोडून दिला जातो. यावेळी निर्धार करा तुमच्यासोबत राहणारा विश्वासू शिवसेना असताना दुसऱ्याच्या सांगण्यावर निर्णय का फिरवता असा सवालही उत्तर भारतीय लोकांना केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, जगातील सर्वाधिक काळ दोन राजकिय पक्षांची युती होती. मात्र ही युती सर्वात आधी कोणी तोडली. तुम्ही तोडली म्हणून आम्ही दिवसाढवळ्या काँग्रेससोबत गेलो. पण तुमच्या सारखे आम्ही गुपचूप पळून गेलो नाही असा उपरोधिक टोलाही शिंदे गटाला लगावला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, राज्यात मी मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली. बरं काय केलं त्याने. मग महाराष्ट्रात हनुमान चालिसा चालला नाही म्हणून कर्नाटकात हनुमान आणला. पण हनुमानाने अशी काय गदा हाणली की ते परत उठण्याची कोणतीच चिन्हे दिसेना अशी टीकाही भाजपाचे नाव न घेता केली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आता तुमचे दोन इंजिनचे सरकार बसलेले असताना औरंग्याची वळवळ वाढते कशी असा सवाल करत कदाचीत तुंमच घराण औरंगजेबाचं असल्यानेच ही सगळी बाहेर येत आहेत. औरंगजेबाने टाकलेल्या दुहीच्या बीजेला आपलेच लोक फितुर होतात. त्यामुळे औरंगजेब अजूनही अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यारूपात जीवंत आहे. त्यामुळेच ते ईडी सीबीआयची भीती दाखवित इतर पक्षातील लोकांना सरकारमध्ये सामिल करून घेत आहेत मग देवेंद्र फडणवीस काय करणार आहे असा सवाल करत फक्त त्यांच्याकडे मस्टर मंत्री पद ठेवणार का अशी उपरोधिक टीकाही केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता रक्षाबंधन जवळ येत आहे. काही हिंदू भगिनी जातील त्यांना राखी बांधायला आणि त्याबदल्यात पदरात ईडी, सीबीआयची चौकशी काढून घेण्याची मागणी करतील अशी खोचक टीका खासदार भावना गवळी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करत जर खरंच तुम्हाला रक्षाबंधन साजरे करायचे असेल तर मुस्लिम भगिनीकडून राखी बांधून घ्या, त्या बिल्कीस बानोकडून राखी बांधून घ्या असे आव्हानही दिले.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, हेमंत करकरे यांची हत्या कसाबने नव्हे तर आरएसएसच्या…

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) माजी प्रमुख हेमंत करकरे यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *