Breaking News

Tag Archives: recruitment

ग्रामविकास विभागातील पदे तत्काळ भरणार -ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची विधानसभेत माहिती

ग्रामविकास विभागातील कामकाजाला चालना मिळावी यासाठी ग्रामविकास विभागातील १३ हजार ४०० पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तत्काळ ही पदे भरली जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हंगरगा व दापका या दोन गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी …

Read More »

अनुसूचित जमाती प्रवर्गातील ३ हजारहून अधिक जागांसाठी ३१ जुलै पर्यंत भरती प्रक्रिया मंत्री दीपक केसरकर यांची विधान परिषदेत माहिती

अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या आणि त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर कायम ठेवले आहे. यामध्ये आदिवासी उमेदवारावर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन त्यांना त्वरित न्याय मिळावा म्हणून रिक्तपदे भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने भरतीप्रक्रिया तातडीने राबवणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. …

Read More »

लवकरच ३ हजार ११० तलाठी भरती ५१८ मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार

गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठयाकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब व्हायचा आणि महसूल यंत्रणेवर ताण येत होता. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. येत्या काही दिवसांमध्ये तलाठी भरती आणि …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचे आदेश, ८० टक्के अपाजपत्रित तर सरळसेवेतील १०० टक्के पदे भरा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यातील ७५ हजार शासकीय पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी पदभरती संदर्भात १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे निर्देश, अनुसूचित जमातीची रिक्त पदे तात्काळ भरा

अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्ती विषयक लाभ देण्या बाबतचा त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टीकोनातून तांत्रिक खंड देऊन पुन्हा ११ महिन्यांच्या कालावधीकरिता त्यांच्या सेवा पुन्हा सुरु ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील तात्काळ सुरू करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले. …

Read More »

वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब/क संवर्गातील साडेचार हजार पदे भरणार

वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब/क संवर्गातील साडेचार हजार पदे भरण्यात येणार आहे. सदर पदभरती प्रक्रिया टी.सी. एस. आयओएन या कंपनीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील पदे १०० टक्के प्रमाणात भरण्यास ५ मे २०२१ रोजी मान्यता देण्यात आली आहे. …

Read More »

भूमी अभिलेख विभाग सरळसेवा भरती २०२१, या तारखेला होणार परिक्षा

भूमी अभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमूह (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या पदाची परीक्षा २८,२९ आणि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये पुणे विभागाची तर सत्र २ मध्ये कोकण विभागाची परीक्षा होईल. २९ नोव्हेंबर रोजी सत्र एक मध्ये …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, उर्वरित जागांसाठीही पदभरती प्रक्रिया राबविणार

प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून २ हजार ८८ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबची रोस्टर प्रक्रिया वेळेत पूर्ण करून उर्वरित पद भरती बाबतही  आढावा घेऊन टप्याटप्यांनी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल. या भरती प्रक्रियेबाबत शासन सकारात्मक असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील पुढे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, वर्षभरात ७५ हजार नोकऱ्या उपलब्ध करणार

रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्र मिळालेल्या राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याअंतर्गत कोकण विभागातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आदेशः शारीरिक शिक्षक, ग्रंथपाल पद भरती करा

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अनुदानित महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पदांचा आढावा घेऊन संबंधित पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करावी. राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित अनुदान दरात ६० टक्के वाढ करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रिक्त पदांचा तसेच वस्त्रोद्योग विभागातील …

Read More »