Breaking News

Tag Archives: power sector

राज्यात ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि एसजेवीएन यांच्यात सामंजस्य करार

ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन) यांच्यामध्ये ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. …

Read More »

महाराष्ट्राला मिळाला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार’ ऊर्जा क्षेत्रातील कामगिरी बद्दल स्कॉच कंपनीकडून सन्मान

ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्राला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवार्ड इन पावर अँड एनर्जी’ प्रदान करण्यात आला. राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्कॉच ग्रुपच्यावतीने शनिवारी येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या सिल्वर ओक सभागृहात आयोजित कार्यक्रमात शासन, अर्थ, बॅंकिंग, तंत्रज्ञान  क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात …

Read More »

कोरोना इफेक्ट आता ऊर्जा विभागाच्या शासकीय कंपन्यांवर…पैसाच नाही २० हजार कोटींच्या कर्ज उभारणीस शासन हमी: मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व उद्योग आणि वाणिज्यिक उपक्रम बंद आहेत. सर्वसामान्य जनता देखील घरी असल्यामुळे घरगुती वीज ग्राहकांकडून विजेचा जास्त वापर होऊन औद्योगिक ग्राहकांची विजेची मागणी कमी झाली आहे. महाराष्ट्रातील विजेची सरासरी रोजची मागणी २३ हजार मेगावॅटवरुन १६ हजार मेगावॅट इतकी कमी झाली आहे. …

Read More »

पॅकेज ४- आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण, अंतराळ, कोळसा, खाण उद्योगात खाजगी कंपन्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कोरोना संकटाला संधीत रूपांतरीत करण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा नारा देत लोकल टू ग्लोबल बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातील ४ थ्या टप्प्यात अंतराळ, ऑटोमिक एनर्जी, संरक्षण, इस्त्रो, खाणी, विमानतळ, वीज वितरण, रिमोट सेंन्सिंग आदी क्षेत्रातील सरकारची एकाधिरशाही संपुष्टात आणत खाजगी गुंतवणूकदारांच्या मदतीने …

Read More »

मोफत वीज द्यायचीय, पण ४० हजार कोटी कसे जमा करायचे? ऊर्जा विभागासमोर मोठा प्रश्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील १०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज मोफत देण्याची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत केली. मात्र या मोफत वीजेपोटी वीज महावितरण पर्यायी राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणाऱ्या ४० हजार कोटी रूपयांच्या आर्थिक बोज्याचे वसुली कशी करायची असा प्रश्न ऊर्जा विभागाला पडल्याची माहिती वीज महावितरणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. …

Read More »