Breaking News

Tag Archives: pandharpur

मुख्यमंत्री शिंदे यांचे साकडे, ‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा संपन्न

बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्यांच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या …

Read More »

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी घेतले पांडूरंगाचे दर्शन, तर अनेकांनी केला बीआरएसत प्रवेश

गुरूवारच्या आषाढी एकादशी वारी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी पंढरपूरच्या दर्शनासाठी पांडूरंगाच्या दिशेने पायी येत आहेत. तसेच जगदगुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराड, संत चोखामेळा आदींच्या पालख्यांसोबतही अनेक वरकरी पंढरपूरच्या दिशेने येत आहेत. याचेच औचित्य साधत राज्याच्या राजकारणात सध्या शिरकाव करू इच्छिणारा भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख तथा …

Read More »

आषाढी वारीमध्ये ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ उपक्रम सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची माहिती

“आषाढी एकादशीला पंढरपूर येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. शेजारच्या राज्यांमधील भाविकांचाही त्यामध्ये समावेश असतो. यंदाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे. या दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, पंढरपूर येथे आल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याची आरोग्य तपासणी व्हावी, आपात्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा तात्काळ मिळावी, या उद्देशाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून ‘आरोग्याची वारी …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, वारीतील प्रत्येक दिंडीला ५० हजार रुपये द्या अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे उच्चाटन करण्यात वारीचे मोठे योगदान

पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत जात असतात. वारीमार्गाच्या या प्रवासात भजन, किर्तन, प्रवचन, भारुडांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीचे कार्यही होत असते. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने वारीतील दिंड्यांच्या माध्यमातून होत असलेल्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, पंढरीच्या आषाढी वारीसाठी टोल माफ रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता-पाणी-आरोग्य सुविधांवर लक्ष द्या- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या …

Read More »

टोलप्रश्नी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र आषाढी वारीनिमित्त टोल वसुली पुढे ढकला

महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची प्रस्तावित टोल वसुली प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय भूतल परिवहन मत्रीनितीन गडकरी यांना केली आहे. यावर्षी आषाढी यात्रा २९ जून रोजी होणार आहे.सुमारे सात लाख भाविक व त्यांची …

Read More »

पंढरपूर मंदिर विकास, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील राज्य शिखर समितीच्या बैठक

राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यांचे डिजिटल मॅपिंग करण्यात यावे. जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर …

Read More »

बा… विठ्ठला, शेतकरी-कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर !

“गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा”, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, पंढरपूरसह देहू-आळंदीचाही विकास करणार वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव

वारकरी संप्रदाय ही मोठी शक्ती असून या संप्रदायाने भजन व किर्तनाच्या माध्यमातून मानवकल्याण आणि विश्वशांतीचा संदेश दिला. मानवाला सद्विचार देणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मृदंग ज्ञान शिक्षण संस्थेव्दारे आळंदी येथे आयोजित संत दासोपंतस्वामी आळंदीकर यांचा गुरुपूजन सोहळा, संस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा आणि …

Read More »

पंढरपूरच्या विकास आराखड्यात सहभागी होण्याची संधी विकास आराखड्याबाबत 26 सप्टेंबरपर्यंत लेखी सूचना द्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडयामध्ये समाविष्ट कामाबाबत १२ सप्टेंबर २०२२ रोजी खासदार, आमदार, मंदीर समितीचे विश्वस्त, पालखी सोहळयाचे विश्वस्त, व्यापारी प्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. आराखड्याबाबत आणखी काही सूचना असतील तर लेखी स्वरूपात 26 सप्टेंबर २०२२ पर्यंत देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. आराखड्याबाबत लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पालखी …

Read More »