गुरूवारच्या आषाढी एकादशी वारी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी पंढरपूरच्या दर्शनासाठी पांडूरंगाच्या दिशेने पायी येत आहेत. तसेच जगदगुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराड, संत चोखामेळा आदींच्या पालख्यांसोबतही अनेक वरकरी पंढरपूरच्या दिशेने येत आहेत. याचेच औचित्य साधत राज्याच्या राजकारणात सध्या शिरकाव करू इच्छिणारा भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज सकाळी पंढरपूरात येवून पंढरीच्या पांडूरंगाचे दर्शन घेतले.
वारकऱ्यांचे एकदंर संख्या पाहता मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यासोबत आलेल्या सर्वच खासदार, आमदार आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्याना एकाचवेळी जाऊन मंदिरात जावून दर्शन घेण्यास महाराष्ट्र पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांच्या काही निवडक साथीदारांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास परावनगी दिली. तर उर्वरित बीआरएसच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांना नामदेव पायरीचे दर्शन पर्यंत आणि नामदेव पायरीचे दर्शन घेण्यास परवानगी दिली.
పండరిపూర్ లో శ్రీ విట్ఠల్ రుక్మిణీ దేవీ ఆలయంలో ప్రత్యేక పూజల్లో పాల్గొన్న ముఖ్యమంత్రి శ్రీ కేసీఆర్ pic.twitter.com/CXGIFfSfHt
— Telangana With KCR (@TSwithKCR) June 27, 2023
दर्शनानंतर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातून येताना राज्याचे मंत्रिमंडळ आणि त्यांच्या पक्षातील आमदार, खासदार आणि अन्य कार्यकर्त्यांना घेऊन ६०० गाड्यांचा ताफा घेऊन सोलापूरला आल्याने त्यांच्या दौऱ्याची चर्चा राज्याच्या राजकिय वर्तुळात सुरु झाली.
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांचे मंत्रिमंडळ अन् नेते मंडळी हे सोलापुरात दाखल झाले आहेत. भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिक कदम आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बी. जे. देशमुख यांनी महाराष्ट्र सरकार विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Watch Live: Leaders from various parties in Maharashtra joining the BRS Party in the presence of Party President, CM Sri KCR, at Solapur. https://t.co/DjJRZpS8cn
— BRS Party (@BRSparty) June 27, 2023
तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे विठ्ठल भक्त आहेत. दर्शनासाठी आले आहेत. त्याबाबत महाराष्ट्र सरकारने राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. बीआरएसचे राज्य प्रमुख माणिक कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही तिखट शब्दांत टीका केली. राष्ट्रवादीने शेतकऱ्यांचे गळे दाबले आहेत, म्हणून राष्ट्रवादीमधील काही शेतकरी नेते बीआरएस पक्षात प्रवेश करत आहेत, असे ते म्हणाले.