Breaking News

Tag Archives: nana patole

सोनिया व राहुल गांधींना खोट्या केसमध्ये गोवण्यासाठीच ईडीची नोटीस देशाची लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसचे ‘भारत जोडो’ अभियान: नाना पटोले

केंद्रातील भाजपाचे सरकार मनमानी, अत्याचारी असून विरोधकांनाही संपवण्याचे काम करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना भिती दाखविली जात आहे. उदयपुर शिबिरामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य व उत्साह वाढला असल्याने भाजपाने धास्ती घेतली आहे. म्हणूनच सोनिया गांधी, राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडवण्यासाठी ईडीची नोटीस पाठवली आहे. परंतु अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष …

Read More »

काँग्रेस पक्ष भाजपा आरएसएससारखा हुकूमशाह नाही प्रदेश काँग्रेसच्या दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेची सांगता

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिर्डीत पार पडलेल्या दोन दिवसांची नवसंकल्प कार्यशाळेत राजकीय, सामाजिक मुद्द्यांसह विविध मुद्द्यांचा सखोल उहापोह करण्यात आला. या शिबिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली व त्यातून एक महत्वाचा दस्तावेज तयार झाला आहे. हा दस्तावेज जाहीरनाम्यासह विविध योजना राबवण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. काँग्रेस पक्ष लोकशाहीला माननारा पक्ष असल्याने या …

Read More »

भाजपाच्या ‘भारत तोडो’ला काँग्रेस देणार ‘भारत जोडो’ने उत्तर ‘हिमालय’ संकटात असल्याने ‘सह्याद्री’ पुन्हा मदतीला धावेल !: नाना पटोले

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकशाही विरोधी, जनविरोधी असून हे सरकार उलथवून लावले पाहिजे. एक सक्षम देश म्हणून उभे करण्यात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे. परंतु मागील ८ वर्षात देशातील वातावरण पूर्णपणे बदलले असून जाती-धर्माच्या भिंती उभ्या करून ‘भारत तोडो’चे राजकारण केले जात असून या विध्वंसक प्रवृत्तीला थोपवून काँग्रेसच्या …

Read More »

फडणवीसांच्या टीकेवर नाना पटोले म्हणाले, श्रीमंत शाहु महाराजांचे वक्तव्य स्पष्ट शरद पवार आणि फडणवीसांमधील संबध आपल्याला माहित नाही

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे आणि शिवसेनेतील बोलणी फिस्कटल्यानंतर संभाजी राजे आणि भाजपाने शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. त्यानंतर दस्तुरखुद्द श्रीमंत शाहु महाराज यांनीच याप्रश्नावर संभाजीराजे यांचे कान टोचत त्या सगळ्या खेळामागे देवेंद्र फडणवीस हेच असल्याची शक्यता वर्तविली. त्यानंतर फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …

Read More »

फडणवीस यांचा सवाल, पेट्रोल का महाग? उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले सांगा पेट्रोल डिझेल दरवाढ, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी एल्गार पुकारा

देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलीटर तर राज्याचा कर २९ रुपये आहे. आता उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले सांगा, राज्यात पेट्रोल डिझेलची महागाई कोणामुळे आहे, असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या विषयावर आंदोलन करून खोटारड्यांना उघडे पाडण्याचे आवाहन …

Read More »

अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटलांचे म्हणणे खरे, पण पटोलेंचे ते विधान चुकीचे शेतकऱ्यांनो घाबरू नका...आणि टोकाचा निर्णय घेऊ नका... सरकार तुमच्या पाठीशी आहे

भाजपाचा तो केविलवाणा प्रयत्न आहे. पवारसाहेबांचे भाषण नीट ऐका. एका कवीचा दाखला त्यांनी दिला आहे. पण ते न दाखवता वेगळंच दाखवलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शरद पवार हे एकटे राष्ट्रवादी चालवतात असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे .बहुतेक ठिकाणी तीच परिस्थिती असते. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे चालवत …

Read More »

कायदा तोडणारा कोणीही असो राज्य सरकार कारवाई करेल राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची राज्य सरकारने खबरदारी घ्यावी: नाना पटोले

महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. राज ठाकरे यांनी जर कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावरही कारवाई करेल, असे काँग्रेस …

Read More »

भोंग्यावरून महाराष्ट्रात चालवलेला तमाशा बंद करा मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपाकडून राज ठाकरेंचा वापर-नाना पटोले

भोंग्याचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. या प्रकारामुळे राज्याची बदनामी तर होत आहेच, पण गुंतवणुकीवरही परिणाम होईल आणि रोजगार निर्मितीला खिळ बसण्याचा धोका आहे. घटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यात जर कोणी अडथळे आणत असतील त्यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी व महाराष्ट्राला …

Read More »

मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपाची ‘बुस्टर सभा’ पुरोगामी महाराष्ट्रातील जात्यांध्य व धार्मिक विचार थांबवा !: नाना पटोले

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला व तोच विचार राज्याच्या हिताचा आहे परंतु मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात जात्यांध्य व धार्मिक विचाराला पुढे करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हा जात्यांध विचार थांबवण्याची गरज …

Read More »

मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठीच धार्मिक मुद्द्यांचा आधार ‘गाव तिथे काँग्रेस’ संकल्प राबवण्यासाठी संघटना मजबूत करा-नाना पटोले

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून देश ५० वर्षे मागे गेला आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच भारतीय जनता पक्षाकडून धार्मिक मुद्दे पुढे करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहेत. भाजपाच्या या षडयंत्राला बळी न पडता भाजपा व मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर उघडे …

Read More »