Breaking News

Tag Archives: nana patole

तीन काळे कृषी- कामगार कायदे, महागाई, बेरोजगारी विरोधात विरोधी पक्षांचा एल्गार झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी सोमवारच्या ‘भारत बंद’ला सक्रीय पाठिंबा : नाना पटोले

अकोले: प्रतिनिधी केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कामगारविरोधी सरकार असून महागाई, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यातही मोदी सरकार सपशेल फेल ठरले आहे. देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे, वाढती बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यावर जनतेत तीव्र असंतोष आहे. देशातील जनता समस्यांचा सामना करत असताना झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्रातील …

Read More »

मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत नाना पटोलेंचा केंद्रावर निशाणा ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गीय मुलांनी डॉक्टर होऊ नये म्हणून NEET आणली का ?: नाना पटोले

 मुंबई: प्रतिनिधी देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET परीक्षेचे आयोजन केले जाते. परंतु या परिक्षेत दिवसेंदिवस वाढणारे गैरप्रकार पाहता NEET परीक्षा व्यापम घोटाळ्याचा पुढचा अंक आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पेपर फोडून, डमी विद्यार्थी बसवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असून गरीब, मध्यमवर्गीय मुला-मुलींनी डॉक्टर होऊ नये म्हणून NEET चा …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या “भावी सहकारी” आणि “डाव्हर्जन” वर मुख्यमंत्र्यांसह कोण काय म्हणाले ? भाजपा मंत्र्याकडे पाहून मुख्यमंत्र्याचे वक्तव्य

औरंगाबाद: प्रतिनिधी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरवातीलाच आपल्या भाषणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व आजी-माजी आणि भावी सहकाऱी असा उल्लेख करत राजकिय वर्तुळात उत्सुकता वाढवत दुसऱ्याच क्षणाला म्हणाले की मला रेल्वे फार आवडते, रेल्वेचे एक बराय त्याला रूळ असतात, त्यामुळे ती इकडे-तिकडे जावू शकत नाही. …

Read More »

ओबीसी आरक्षणप्रश्नी ही तर भाजपाची नौटंकी, पाप झाकता येणार नाही मोदी व फडणवीसच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी त्यांच्याविरोधात आंदोलन करावे-नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील भारतीय जनता पक्ष करत असलेले आंदोलन ही नौटंकी आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त महाराष्ट्राच नाही तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. आंदोलनाची नौटंकी …

Read More »

सरकार जे बोलतं ते कृतीत दिसत नाही देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

नागपूर: प्रतिनिधी ओबीसी आरक्षणप्रश्नावर आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका घ्यायच्या नाहीत असा निर्णय सर्व पक्षियांच्या उपस्थित राज्य सरकारने घेतला. मात्र आता निवडणुका लागल्या आहेत, तर त्याला आम्ही सामोरं जाऊ, पण एकप्रकारे सरकार जे बोलतं ते सरकारच्या कृतीत मात्र कुठं दिसत नाही असे स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

न्यायालयाचे निकाल राज्याच्या विरोधात का जात आहेत ? नाना पटोलेंचा भाजपाबरोबरच आता थेट राज्याच्या महाधिवक्त्यांवर निशाणा

नागपूर : प्रतिनिधी राज्यातल्या ओबीसींना आरक्षण देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरियल डेटा घेवून पुन्हा न्यायालयात येण्यास सांगितले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आम्हाला त्यांच्याकडील डेटा आम्हाला द्यावा अशी मागणी करत आरक्षण न मिळण्यास भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत राज्याचे महाधिवक्ता पूर्वी आणि आताही आशुतोष कुंभकोणी हेच असताना …

Read More »

पवारांना पटोलेंचे प्रत्युत्तर, “राखायला दिलेल्यांनीच जमीन चोरली” शरद पवारांच्या टीकेनंतर काँग्रेसकडून उपरोधिक टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज गणेश चतुर्थीचा दिवस असल्याने राजकिय क्षेत्रात सगळी शांतता असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसची अवस्था एखाद्या जमिनदाराच्या हवेली सारखी झाल्याची टीका करत खळबळ उडवून दिली. त्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यास प्रत्युत्तर देत जमीन राखायला दिलेल्यांनीच जमिनीची चोरी केल्याचा पलटवार करत पवारांवर …

Read More »

नानांच्या नाना तऱ्हा… विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी नाना पटोले यांचा नवा चेहरा पुनः महाराष्ट्राला पाहायला मिळाला. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा अशा प्रकारे, नाना यांचा बैठकीत मुजरा आणि मिडियात गोंधळ असं एक गोंधळी नाना म्हणून नवं कॅरेक्टर या निमित्ताने महाराष्ट्राला बघायला मिळालं असून नानाच्या नाना तऱ्हा, असा टोला आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

ओबीसी आरक्षण : डेटा नाहीतर निवडणूकाही नाही इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्यादृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा इंपिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करावा, यासंबंधीचे निर्देश राज्य मागास वर्ग आयोगास देण्यात यावेत यावर आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत एकमताने सहमती देण्यात आली.त्याचबरोबर हा डेटा गोळा करण्यास उशीर होणार असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका …

Read More »

इंधन, गॅसच्या किंमती वाढवून मोदी सरकारकडून जनतेचे रक्तशोषण केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’- नाना पटोले यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार उद्योगपती ‘मित्रों’साठीच काम करत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आधीच महागाईने जगणे कठीण झाले असताना आज पुन्हा स्वयंपाकाचा गॅस २५ रुपयांनी महाग करुन केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून जळूप्रमाणेच …

Read More »