Breaking News

सरकार जे बोलतं ते कृतीत दिसत नाही देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

नागपूर: प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणप्रश्नावर आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका घ्यायच्या नाहीत असा निर्णय सर्व पक्षियांच्या उपस्थित राज्य सरकारने घेतला. मात्र आता निवडणुका लागल्या आहेत, तर त्याला आम्ही सामोरं जाऊ, पण एकप्रकारे सरकार जे बोलतं ते सरकारच्या कृतीत मात्र कुठं दिसत नाही असे स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.

नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषोत ते बोलत होते.

त्याचबरोबर राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याबाबत नाना पटोले जे बोलले आहेत, त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. कारण, मुख्यमंत्र्यांनी कुंभकोणी यांना नियुक्त केले आहे. या सरकारने त्यांना पुन्हा नव्याने नियुक्त केलं आणि त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे सांगत ठाकरे सरकारमधील अंतर्गत बाबींवर भाष्य केले.

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, एकीकडे करोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक असो तो अडचणीत आहे आणि तो अडचणीत असताना त्यांना मदत करण्याच्या ऐवजी, त्याच्याकडून जबरदस्ती वसूली या सरकारला करायची आहे. सावकारासारखी वसूली करायची आहे. म्हणून हे सगळं नाटक सुरू असल्याची अशी टीका त्यांनी केली.

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी जे सांगितलं, त्यातूनच हे लक्षात येतं की, त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली. पणही जी काही थकबाकी आपण दाखवतो, याच्यामध्ये विशेषत: कृषी पंपाच्या संदर्भात आपण क्रॉस सबसिडी करतो. त्यानंतर जो काही आपला तोटा आहे, हा भरून काढण्यासाठी आपल्याला जे टेरिफ मिळतं, त्यामधून हा तोटा आपण भरून काढतो. त्यामुळे मला असं वाटतं की, या ठिकाणी जबरदस्तीने वसूली करण्यासाठी हा सगळा बाऊ तयार करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

प्रविण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की, ते बोली भाषेत बोललेले आहेत आणि त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाणं हे योग्य नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही मुद्दे नाहीत. त्यामुळे असे मुद्दे घेऊन ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत असा टोलाही त्यांनी लागवला.

Check Also

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुंबई हे केवळ स्वप्नांचे शहर नाही तर… राजभवनावरील कार्यक्रमात बोलताना भविष्यकालीन योजनांचा सुतोवाच

पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील राजभवनला पोहोचले. राजभवन …

Leave a Reply

Your email address will not be published.