Breaking News

अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटलांचे म्हणणे खरे, पण पटोलेंचे ते विधान चुकीचे शेतकऱ्यांनो घाबरू नका...आणि टोकाचा निर्णय घेऊ नका... सरकार तुमच्या पाठीशी आहे

भाजपाचा तो केविलवाणा प्रयत्न आहे. पवारसाहेबांचे भाषण नीट ऐका. एका कवीचा दाखला त्यांनी दिला आहे. पण ते न दाखवता वेगळंच दाखवलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शरद पवार हे एकटे राष्ट्रवादी चालवतात असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे .बहुतेक ठिकाणी तीच परिस्थिती असते. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे चालवत होते. तर भाजपामध्ये नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आला म्हणून भाजपाच्या बोलणार्‍या लोकांना संधी मिळाली आणि आम्हाला आमच्या साहेबांमुळे संधी मिळाली. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या लोकांचा करिष्मा आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील बोलले ते खरे आहे. त्यांच्या बोलण्याला माझे अनुमोदन असल्याची टीका असा टोलाही त्यांनी लगावला.
जनता दरबार उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नाना पटोले यांचे स्टेटमेंट चुकीचे आहे. ते कुठुन आले आहेत ते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे भाजपाने बोलावं का नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेडलाईन बनण्यासाठी ते बोलले असावेत. जबाबदार नेत्याने वक्तव्य करताना वेडेवाकडे परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असेही त्यांनी सुनावले.
यावेळी आमचेही काही पदाधिकारी त्यांनी घेतले आहेत. १५ वर्षे कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोघांनी सरकार चालवले आहे. त्यावेळी कार्यकर्ते घेत होतो. इतर पक्षात जाऊन त्यांची ताकद वाढण्यापेक्षा एकमेकांच्या पक्षात राहतील हे पाहिले पाहिजे. आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवार खुपसत नाही आणि असे कधीही बोलत नाही असेही ते म्हणाले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो घाबरू नका… ऊस गाळप संपवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे… कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका… सरकार तुमच्या पाठीशी आहे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ऊसाचे काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे. सध्या गळीत हंगाम वाढला आहे. मे महिन्यात रिकव्हरी लॉस आहे. यावर साखर आयुक्त व सहकारमंत्री आढावा घेत आहेत. बीड जिल्हयात दु:खद घटना घडली आहे. आमच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली यावर बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना सरकारच्यावतीने विश्वास दिला.
सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो सरकारला मान्य करावा लागतो.राजद्रोह कलमाचा वापर करु नका असे सुप्रीम कोर्टाने केंद्रसरकारला सांगितले आहे. त्यामुळे त्या निर्णयाचे पालन केंद्रसरकार करणार आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
कार्यालय कुठे काढावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात देशभरातून लोक येत असतात. यूपीचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात भवन उभारणार आहेत त्याला आमचा विरोध नाही आम्हीही युपीत जाऊन भवन किंवा कार्यालय काढू शकतो असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.
मनसेचे बाळा नांदगावकर हे गृहमंत्र्यांना भेटले आहेत. प्रत्येकाला या राज्यात सुरक्षित वाटावं हे सरकारचं काम आहे. जी धमकी आली आहे किंवा जे काही माहिती त्यांनी दिली आहे त्याबाबत गृहमंत्री निर्णय घेतील. कुणाला संरक्षण दिले पाहिजे याबाबत एक समिती असते ते निर्णय घेतात असेही त्यांनी सांगितले.
विदर्भात जेवढा पक्ष वाढायला हवा तेवढा पक्ष वाढलेला नाही, अशी खंत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. देशात महागाईने जनता होरपळत आहे, मागील दोन वर्ष कोरोनामुळे जनतेने मोठा त्रास सहन केला आहे. तसेच इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे असताना त्यातून जनतेला बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु आहे. मात्र काहीजण वेगळे विषय काढून दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.
कायदा व सुव्यवस्था चांगली असेल तर समाधानाने काम करता येते असेही अजित पवार म्हणाले. राज्यसरकार बळीराजाच्या हितासाठीही काम करत आहे. जे विकेल ते पिकेल यादृष्टीने सरकार पावले टाकत आहे अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील विविध पक्षांमधील अनेक जि. प. व पं. स सदस्यांनी आणि अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज प्रवेश केला.
पक्षप्रवेश झालेल्या सर्व मान्यवरांचे बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादीत स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राजकीय जीवनात काम करताना एक खमक्या नेतृत्वाची गरज असते. त्यामुळे पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांना अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळेल असेही ते म्हणाले.
यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाझीर काझी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामरकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात माजी सभापती सागर पाटील, पंचायत समिती सदस्य मेहकर, यवतमाळचे माजी उपसभापती सुरेश मेश्राम, बुलढाणा जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, जिल्हा परिषद सदस्या ज्योती खेडेकर, जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद मगर, मनोहर मस्के, माजी उपसरपंच, प्रशांत बोरे, संदिप गार्डे, अनंता बाहेकर, सतीश खेडेकर, अमोल खेडेकर यांनी पक्षात प्रवेश केला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *