Breaking News

Tag Archives: mns chief raj thackeray

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, एका बाजूला भोंगे आहे तर दुसऱ्या बाजूला सोंगे नागपूरात बोलताना राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका

एका बाजूला भोंगे आहे तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत. भोंग्याच्या विषयावर वाद होता कामा नये. पिढ्यान पिढ्यांपासून मशिदींवर भोंगे असतात. ते उतरण्याची मागणी करण्यापेक्षा राज ठाकरेंना मंदिरावर भोंगे लावयचे असतील तर त्यांनी लावावेत. पण धर्माधर्माध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले य़ांनी मनसेप्रमुख राज …

Read More »

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, संघटना-व्यक्ती कोणीही असो कारवाई करणार पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर अधिकृत माहिती देणार

परिस्थिती बिघडेल असं वाटत नाही. पण आम्हीदेखील पुर्ण तयारीत आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी काळजी घेत आहोत. कोणत्याही वक्तव्यामुळे, कृतीमुळे समाजात तेढ, अशांतता निर्माण होत असेल तर अशी कोणतीही कृती कारवाईला पात्र ठरते. मग ती संघटना, व्यक्ती कोणीही असो. कारवाई केली जाईल असा गर्भित इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे …

Read More »

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात संजय राऊत म्हणाले, ही आमची पायवाट दौऱ्यासंदर्भात शिवसेना भवनात झालेल्या बैठकीनंतर दिली माहिती

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या आधी शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्याच्या अनुषंगाने आज शिवसेना भवनात सेना नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, ही आमची पायवाट आहे. अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही. गेली ३० वर्षे शिवसेना आणि अयोध्या यांचं एक नात निर्माण झालेलं …

Read More »

परवानगी घेवून अक्षयतृतीयेला राज्यभरात महाआरती करणार मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती

जून महिन्यात मनसेप्रमुख राज ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असून त्यादृष्टीने नियोजन करण्याची तयारी सध्या मनसेकडून करण्यात येत आहे. याशिवाय आगामी काळात राज ठाकरे यांनी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील रणनीती आखण्यात येत असून अक्षय तृतीयेला राज्यात सर्व ठिकाणी महाआरती करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी चुलत भावाची समजूत काढावी माजी आमदार लक्ष्मण माने यांची मागणी

गुढी पाडव्याल्या झालेल्या मनसे मेळाव्यात मस्जिदीवरील भोंगे काढण्याच्या मुद्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भूमिका घेत मौलवींसह राज्य सरकारला तीन मे चा अल्टीमेटम दिला. क्यामुळे राज्यात तणाव निर्माण होवू शकतो अशी भीती व्यक्त करत माजी आमदार लक्ष्मण माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपले चुलत बंधू राज ठाकरे यांना आवरावे …

Read More »

अखेर राज ठाकरेंच्याच “त्या” व्यंगचित्रातून शिवसेनेने दिले मनसेला प्रत्युत्तर सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदूत्व

राज्यात मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लक्ष्य करत अल्टीमेटम दिला. तसेच राज्यातील हिंदूत्वाच्या मुद्यावरूनही आक्रमक भूमिका स्विकारण्यास सुरुवात केली. तसेच नुकताच अयोध्या दौराही राज ठाकरे यांनी जाहीर केला. मात्र याच अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केलेली पुन्हा शिवसेनेने सव्याज परत करत त्यांचेच एक …

Read More »

भोंग्याच्या संदर्भात लवकरच धोरण, अधिसूचना जारी होणार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

राज्यातील मस्जिदीवरील भोंग्यांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मौलवी आणि राज्य सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर राज्य सरकारकडून या संदर्भात धोरण तयार कऱण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु करण्यात आले आहे. यासंदर्भात लवकरच पोलिस दलातील अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याच्या संदर्भात पोलीस महासंचालक आणि मुंबई …

Read More »

कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय… महागाईचे चटके कमी होणार का? गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची उपरोधिक टोला

कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय… सर्वसामान्यांच्या जीवनात महागाईचे जे चटके बसत आहेत ते कमी होणार आहेत का? असा संतप्त सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. महागाईकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावं आणि तुमच्या हेडलाईन्स महागाईवर कसं बोलू नये यासाठी हे सर्व केलं जातंय व त्या ट्रॅपमध्ये तुम्ही …

Read More »

नाना पटोलेंचा टोला, राज ठाकरेंनी कोणाची सुपारी घेतली हे देवेंद्र फडणवीसच सांगतील राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांना बंदी घाला- नाना पटोले

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न हाताळण्यास मोदी सरकार कुचकामी ठरले आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढलेला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करु पाहणाऱ्या नेत्यांच्या सभांना राज्य सरकारने परवानगी देऊ नये, अशी मागणी काँग्रेस …

Read More »

अजित पवारांचा खोचक सवाल, अयोध्येला जाण्याचा बोभाटा का, आम्ही गेलो… राज ठाकरेंना लगावला टोला

पुण्यात आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर उलट-सुलट तर्क-वितर्क लढविले जात असताना यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावत खोचक सवाल केला. अहो भारतात कोणी कुठेही जावू शकतो. त्यामुळे ज्याला अयोध्येला जायचं आहे त्याला …

Read More »