Breaking News

कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय… महागाईचे चटके कमी होणार का? गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची उपरोधिक टोला

कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय… सर्वसामान्यांच्या जीवनात महागाईचे जे चटके बसत आहेत ते कमी होणार आहेत का? असा संतप्त सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
महागाईकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावं आणि तुमच्या हेडलाईन्स महागाईवर कसं बोलू नये यासाठी हे सर्व केलं जातंय व त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकताय आणि आम्हाला त्या ट्रॅपमध्ये अडकायचं नाहीय. आम्ही फक्त महागाईवर बोलणार… ते कुठेही जाऊदेत आम्हाला काही करायचं नाही… मात्र एक लक्षात ठेवा लोकं आज ‘श्रीराम’ म्हणतायत… महागाई इतकी वाढू देऊ नका की त्यांना ‘राम नाम सत्य’ आहे म्हणावं लागेल असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादीच्या जनता दरबार उपक्रमास आले असता माध्यमांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या जाण्याचा प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड यांनी कोण कुठेही जाऊदे आम्ही फक्त महागाईवर बोलणार असे स्पष्ट केले.
राज ठाकरे अयोध्येत जाऊदेत किंवा अमृतसरला… कोण कुठे जाणार आहेत त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे… त्यांना कुठली सुरक्षा देणार आहेत त्याच्याशी आमचा काय संबंध… त्यांना मोसा चिमुर द्या नाहीतर अमेरीकेची सीआयए द्या… अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
हेच नको ते विषय पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय… मला महागाईवर विचारलात आणि पोचलात अयोध्येत… असे पत्रकारांना सुनावतानाच तुम्हालाही चिंता नाही भाव कुठे जात आहेत त्याची… पगार कसे आहेत… आपल्या नोकर्‍या राहणार आहेत की नाही…चॅनेल चालणार आहेत की नाही… किती पेपर बंद पडले आणि किती सुरु आहेत याची कुणालाही चिंता नाही मात्र ते अयोध्येला जात आहेत… अहो जाऊ द्या ना तुमचं घर कुठं चाललंय ते बघा…असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला.
महागाईचा दर १४ वर पोचला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने यावर चर्चा करायला हवी पण तुम्हा लोकांना सवय लागलीय नको त्या विषयांना नको त्या विषयांकडे घेऊन जायचं…असेही त्यांनी सुनावले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *