Breaking News

Tag Archives: minister

छगन भुजबळ म्हणाले, एअरबस प्रकल्पासाठी रतन टाटांना पत्र लिहिले…

सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक असून सदरचा प्रकल्प हा नाशिकच्या एचएएल कंपनीत राबविण्यात यावा अशी मागणी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा …

Read More »

कौशल्य विद्यापीठाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटीचे शिक्षण

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने (MSSU) नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमांची घोषणा केली असून नोव्हेंबर २०२२ पासून यांची सुरुवात होणार आहे. विद्यापीठाचा हा शैक्षणिक प्रारंभ कार्यक्रम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

आनंदाचा शिधाचे वितरण आता ऑफलाईन पध्दतीने अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

महाराष्ट्रातील प्राधान्य कुटूंब व अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे १ कोटी ६२ लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणा-या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता १ किलो साखर, १ किलो रवा, १ …

Read More »

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ योजनेचा २० ऑक्टो.पासून शुभारंभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ २० ऑक्टोबर, २०२२ रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली. सुमारे …

Read More »

तहसीलदाराने उघडकीस आणले जमिन हडप करण्याचा प्रकार, मंत्र्याकडून मात्र दबाव

मागील काही वर्षात कोकणात अनेकविध प्रकल्प येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात जमिनीला सध्या सोन्याचा भाव आलेला आहे. त्यामुळे मिळेल त्या जमिनी थेट गुंतवणूकदारांच्या घशात घालण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. तर काही जणांकडून जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून जमिन लाटण्याचे प्रकारही सध्या सुरु झाले आहे. अशीच एक २१० एकर जमिन हडपण्याचा …

Read More »

मंत्री लोढा यांची घोषणा, दिव्यांगासाठी एक खिडकी योजना सुरू करणार 'पालकमंत्री आपल्या भेटीला' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

दिव्यांगासाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या सर्व योजनांचा लाभ महापालिका क्षेत्रात एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. बोरिवली पश्चिम येथील आर सेंट्रल व आर नॉर्थ वॉर्ड येथे ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत …

Read More »

सार्वजनिक बांधकाम विभागातील भूखंडांची ‘लॅण्ड बॅंक’ सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे राज्यात अनेक भूखंड आहेत. यापैकी अनेक भूखंडांचा सध्या वापर होत नाही. तर बहुतेक जागांवर विविध विभागांची शासकीय कार्यालये भाडे तत्वावर आहेत. या सर्व भूखंडाची एकत्रित माहिती गोळा करुन त्या सर्व भूखडांची एक ‘लॅण्ड बॅंक’ तयार करण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. …

Read More »

मंत्र्यांची दिशाभूल करणाऱ्या सहसचिवावर कारवाई मंत्री रवींद्र चव्हाण यांचा जोरदार झटका

मंत्री आणि मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या निर्णय घेतल्याबद्दल मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी विभागाच्या सहसचिवाला जोरदार झटका दिला आहे. एका अधिका-याने हेतूपूरस्सरपणे केलेल्या कृतीची गंभीर दखल घेत त्या अधिका-याची रवानगी मूळ विभागात करण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले आहेत. तसेच मंत्री कार्यालयाची जाणीवपूर्वक दिशाभूल करणा-या या अधिका-याची तातडीने चौकशी करुन …

Read More »

नाना पटोले म्हणाले, सावंतांच्या विधानावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा मराठा समाजावर गरळ ओकणाऱ्या सावंतांची तात्काळ हकालपट्टी करा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले आहे. तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

तानाजी सावंत म्हणाले, सत्तांतरानंतर आता तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली लगेच वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता

काही दिवसांपूर्वी हाफकिन नावाच्या माणसाकडून औषधे घेऊ नका, महाराष्ट्राला भिकारी करायची ताकद आहे, खेकड्यांनी धरण पोखरले सारखी वादग्रस्त विधाने करत नेहमीच चर्चेत राहणारे शिंदे गटाचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी काल रविवारी आणखी एक विधान करत एकच खळबळ माजवली आहे. त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण …

Read More »