Breaking News

Tag Archives: mahesh tapase

राष्ट्रवादी म्हणते, कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ईडी सरकार लवकरच ‘रनआऊट’ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांची टीका

कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात हे ईडी सरकार लवकरच ‘रनआउट’ होईल असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. राजकीय लालसेपोटी ईडी सरकारकडून चुकीचे धोरण स्वीकारले जात नाही ना अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे असेही ते …

Read More »

राष्ट्रवादीचा सवाल, बाळासाहेबांचे दर्शन घेता मग डॉ. आंबेडकरांचे स्मारक लांब होते का… शिंदे गटाची बाळासाहेबांशी आस्था किती आणि लालसा किती हे राज्यातील जनतेला कळले आहे - महेश तपासे

ईडी सरकारमधील मंत्र्यांनी आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. हे दर्शन आस्थेपोटी घेतले असते तर त्यांनी शिवसेना फोडली नसती. शिवसेनेत बंड करायचे आणि आस्था आमची बाळासाहेबांशी आहे हे दाखवायचं यामध्ये आस्था किती आणि लालसा किती हे राज्यातील जनतेला कळून चुकलं आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य …

Read More »

राष्ट्रवादीचा आरोप, मोदी सरकारच्या धोरणामुळे चार महिन्यात १०० अब्ज डॉलरची तूट प्रवक्ते महेश तपासे यांचा आरोप सूचना मागविण्याची केली मागणी

मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आयात – निर्यातमधील वित्तीय तूट या चार महिन्यात १०० अब्ज डॉलर झाली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. एकीकडे वाढती महागाई, बेरोजगारी आणि बेरोजगारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घटणारे मूल्य या सर्वांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार नाही ना अशा …

Read More »

महेश तपासे यांचा आरोप, बेरोजगारीबाबतची मोदी सरकारची आश्वासने खोटी उज्वला योजनेतील लाभार्थ्यांनी पाच वर्षात एकदाही सिलेंडर नव्याने भरला नाही...

महागाई, बेरोजगारी आणि डॉलर या तीन गोष्टींनी मोदीसरकारच्या कार्यकाळात उच्चांक गाठला असल्याने तरुणवर्ग हवालदिल झाला आहे त्यामुळे बेरोजगारी बाबतची मोदींची आश्वासने खोटी ठरली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. ज्या उज्वला योजनेचा गवगवा मोदी सरकारने केला त्या योजनेतील ४.१३ कोटी लाभार्थ्यांनी गेल्या पाच वर्षात एकदाही …

Read More »

महेश तपासे यांचा टोला, भाजपा हा मोठा दगड कधी दुसर्‍याच्या गळयात बांधून… चंद्रकांत पाटील यांना शिंदे सरकार असंविधानिक आहे हे माहीत आहे

शिंदेसरकार बेकायदेशीर आणि असंविधानिक पद्धतीने तयार झाले आहे असे लोकांची धारणा असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे सरकार चालणार नाही म्हणूनच भाजपाने आपल्या मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले आहे व येणाऱ्या काळात भाजपा आपल्या मनावर ठेवलेला हा मोठा दगड कधी दुसर्‍याच्या गळयात बांधून कुणाला बुडवेल? हे लवकरच …

Read More »

राष्ट्रवादीचा आरोप, …हा तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा एक कुटील प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा आरोप

महागाई, बेरोजगारी यांसारखे गंभीर विषय हाताळण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकार विरोधात आवाज उचलला जातो, तेव्हा त्या विरोधकांना केंद्रीय यंत्रणांद्वारा समन्स देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आज होत असताना दिसत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी भाजपा सरकारवर केला. २०१९ मध्ये सुद्धा देशाचे नेते शरदचंद्रजी …

Read More »

राष्ट्रवादी म्हणते, बुलेट ट्रेनला मंजुरी म्हणजे गुजरातसमोर झुकण्याचा प्रकार प्रवक्ते महेश तपासे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी एमएमआरडीएची बीकेसीतील जागा अडवून ठेवण्यात आली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच बुलेट ट्रेनबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत निर्णय घेत एमएमआरडीएची जागा केंद्र सरकारला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेत त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रांवर …

Read More »

महेश तपासेचा केसरकरांवर पलटवार; बेकायदेशीर प्रवक्त्यांचे बेजाबदार वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्युत्तर

दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेना फुटीमागे शरद पवार हेच होते असा खळबळजनक आरोप करत नारायण राणे, राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्या बंडामागे तेच होते. तसेच ही माहिती आपणास शरद पवार यांनीच दिल्याचा दावा केला. या आरोपावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

राज्यात ५० आमदारांचे बंड आणि गॅस मागे ५० रूपयांची दरवाढ काय निष्कर्ष काढायचा? प्रवक्ते महेश तपासे यांचा सवाल

राज्यात एकाबाजूला शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून काही तासांचा अवधी होत नाही तोच आजपासून केंद्र सरकारने गॅसच्या दरात ५० रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने या दरवाढीवरून खोचक सवाल करत निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या सत्ता संघर्षात शिवसेनेतील ४० आमदारांनी तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या १० असे …

Read More »

राष्ट्रवादीचा सवाल, तुम्ही सत्कारात व्यस्त; नैसर्गिक आपत्तीत लोकांनी करायचं काय ? प्रवक्ते महेश तपासे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंना सवाल

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव काल विधानसभेत जिंकला. त्यानंतर नागपूरात देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करत त्यांचा मोठा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यातच मागील …

Read More »