Breaking News

Tag Archives: konkan

पूरग्रस्त दुकानदार, मच्छिमार,सर्वसामान्य, कारागीरांना असे होणार ११ हजार ५०० कोटींचे वाटप आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत ; कायमस्वरुपी धोरण आखण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने ११ हजार ५०० कोटी रुपये इतक्या तरतुदीस मान्यता दिली असून, यामधून मदत, पुनर्बांधणी व आपत्ती सौम्यीकरण यावर खर्च केला जाईल. आपत्तीग्रस्त नागरीकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत करण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या …

Read More »

फडणवीसांची मागणी, पूरग्रस्तांसाठी आणि बाधित भागासाठी या २६ गोष्टी करा पत्राद्वारे मुख्यमंत्री ठाकरेंकडे केल्या या मागण्या.

मुंबई : प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर, सुमारे 26 ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर या मदतीसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत आपल्या सविस्तर मागण्यांसंबंधी एक पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. तातडीच्या आणि दीर्घकालिन अशा दोन्ही वर्गवारीत त्यांनी या मागण्या केल्या आहेत. २५ जुलै …

Read More »

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज-मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व …

Read More »

पूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरा

मुंबई : प्रतिनिधी ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे  पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान ५० टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करत नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कमही कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात …

Read More »

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, पूरग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळेल नागरिकांना तातडीने शासकीय मदत देण्याचे निर्देश

अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर संकट कोसळले, मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुहागर येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. चिपळूण येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्यपाल कोश्यारी चिपळूण दौऱ्यावर आले होते, त्यावेळी …

Read More »

पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरून शरद पवारांचा नेमका कोणाला टोला ? पूरग्रस्तभागात ग्राऊंडवर काम करणाऱ्यांचे लक्ष विचलित होईल असे इतरांनी दौरे करु नयेत - शरद पवार

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एखादी आपत्ती आल्यानंतर त्या भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी दौरे करुन लोकांना दिलासा देण्यासाठी लक्ष घालणे योग्य ठरते. आता स्थानिक प्रशासन, तेथील संघटना आणि कार्यकर्ते पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे इतर लोकांनी पूरग्रस्त …

Read More »

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा! भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून देण्याची तत्परता दाखविण्यासाठी समिती नेमणा-या ठाकरे सरकारने पूरग्रस्त भागातील जनतेच्या भावनांची कुचेष्टा केली असून संकटग्रस्त जनतेच्या हितापेक्षा कर्जबुडव्यांबद्दल कळवळा दाखविणारे ठाकरे सरकार ढोंगी आहे. कर्जबुडव्या बड्या धेंडांसाठी पायघड्या घालत सामान्य संकटग्रस्तांसमोर आर्थिक अडचणीचे पाढे वाचणाऱ्या …

Read More »

तिजोरीत खडखडाट ? पूर- दरडबाधितांच्या मदतीकरीता फक्त २० कोटींचा निधी नुकसान भरपाईसाठी निधी कोठून आणायचा वित्त विभागाला पडला प्रश्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी आधीच कोरोनामुळे बेजार झालेल्या महाविकास आघाडीला आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीचे पुन्हा संकट आले असल्याने या आपत्तीला पैसा कोठून उभा करायचा असा प्रश्न वित्त विभागाला पडला असून तिजोरीत फारसा पैसा नसल्याने सध्या बाधित जिल्ह्यांच्या मदतीकरीता फक्त २० कोटी …

Read More »

पूर परिस्थितीतील मदत आणि गणेशोत्सवासाठी अजून ४० रेल्वे गाड्या रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोकणातील पूर परिस्थितीतून मार्ग काढून रेल्वे लवकरात लवकर सुरु कशी करता येईल जेणेकरून मदत कार्याला वेग येईल.. याबाबत तातडीने आढावा घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना करतानाच गणेशोत्सवासाठी अजून ४० गाड्यांचे नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज केली. भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांच्यासह खासदार …

Read More »

पुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा कोकणासह या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून जारी

मुंबई: प्रतिनिधी काल रात्रीपासून मान्सूनच्या पावसाने मुंबईसह उपमगरात जोरदार बॅटिंग केल्याने अनेक ठिकाणी दरड कोसळणे, संरक्षक भिंत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. त्यातच प्रामुख्यानं कोकणाला पुढील पाच दिवसांसाठी रेड अ‌ॅलर्ट आणि ऑरेंज अ‌ॅलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे मुंबईकरांसह कोकणातील जिल्ह्यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. मात्र, याचेवळी राज्याच्या इतर …

Read More »