Breaking News

Tag Archives: governor

राज्यपालांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, टोपीचा आणि अंत:करणाचा रंग सारखाच.. काही बोलण्यासारखं ठेवलंच नाही

मुंबई आणि ठाण्यातून राजस्थानी आणि गुजराती बाहेर काढले तर पैसाच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मुंबईला आर्थिक राजधानी कोणीही म्हणणार नाही असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आणि त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. काँग्रेस आणि शिवसेनेकडून हे पार्सल पाठवून देण्याची मागणी करण्यात येत आहे. …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा मुंबईबद्दलचे राज्यपालांचे वक्तव्य संतापजनक, महाराष्ट्राची माफी मागा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात जास्त आहे हे त्यांनी विसरू नये परंतु अभ्यास न करता कोश्यारी यांनी बोलून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे तसेच कोश्यारी यांची महामहिम …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणतायत, राज्यपालांचे ते वक्तव्य योग्यच महाराष्ट्राचा अपमान झाला नाही

मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. तसेच कोश्यारी यांनी माफी मागावी, त्यांना राज्यपाल पदावरुन हटवावे अशी मागणी केली जात आहे. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर …

Read More »

‘राज’ इशारा, कोश्यारींची होशियारी ? राज्यपालांच्या त्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी दिला इशारा

मुंबईच्या आर्थिक राजधानीच्या दर्जावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी बाहेर काढले तर इथे पैसाच राहणार नसल्याचे सांगत नंतर मुंबईला आर्थिक राजधानी कोणी म्हणणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना इशारा देत कोश्यारींची होशियारी? असे म्हणत निवडणूकीच्या तोंडावर …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, कोश्यारींनी…“कोल्हापूर का जोडा नही देखा” त्यांना दाखविण्याची गरज राज्यपालांच्या वक्तव्यावर उध्व ठाकरे यांनी व्यक्त केला संताप

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी बाहेर काढले तर पैसाच शिल्लक राहणार नाही. तसेच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नसल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. या वक्तव्यावरून राज्यात राजकिय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत …

Read More »

शिवसेनेचे राज्यपाल कोश्यारींना पत्र, न्यायालयालयाचा निर्णय येईपर्यत या गोष्टी नको… मंत्रिमंडळ विस्तारासह कोणत्याही नियुक्त्या नको

शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारही स्थापन झाले. मात्र या हे सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप करत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. मात्र तरीही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची तयारी सुरु केली आहे. यापार्श्वभूमीवर …

Read More »

एकनाथ शिंदे बंड; २ रा अंक संपण्याच्या आधीच ३ रा सुरु फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यपाल कोश्यारी यांचे बहुमत सिध्द करण्याचे आदेश

राज्यातील महाविकास आघाडी मधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधातच मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविला. या बंडात सहभागी झालेल्या १६ आमदारांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस बजाविल्यानंतर त्याविरोधात शिंदे गटाने भाजपाच्या मदतीने एकप्रकारे स्थगिती मिळविली. मात्र या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच राज्यपाल भगतसिंग …

Read More »

एकनाथ शिंदे अंक दुसरा; राज्यपाल राजभवनात परतताच अॅक्शन मोड मध्ये बंडखोर आमदारांना सुरक्षितता पुरविण्यासाठी पोलिस महासंचालकांना पत्र

राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकाविले. त्यानंतर राज्यात शिवसेनेनेही बंडखोरांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे १६ आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतची याचिका दाखल केली. त्यानुसार उपाध्यक्षांनी १६ जणांना नोटीसा बजावित नोटीस बजावली. …

Read More »