Breaking News

Tag Archives: fertilizer

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, या तीन खतांना पर्यायी चालना द्या.. राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील खते उपलब्धतेचा आढावा

केंद्रीय रसायने आणि खते, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज देशात खतांची उपलब्धता आणि वापराबाबत राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी संवाद साधला. बैठकीदरम्यान त्यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि क्षेत्रीयस्तरावर पर्यायी खतांना चालना देण्याच्या प्रगतीचा आणि त्यासंदर्भात राज्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. डॉ मनसुख मांडविया यांनी सर्व …

Read More »

महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे कृषी विभागाच्या भूखंडांवर शेतकरी व ग्राहक उपयोगी उपक्रम राबवणार-कृषी मंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांना लागणारी खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा …

Read More »

धनंजय मुंडे यांची घोषणा; शेतकऱ्यांसाठी डॅशबोर्ड तयार करणार, जोड खतप्रकरणी चौकशी आता व्हॉट्सअॅपवर तक्रार दाखल करता येणार

राज्यातील शेतकऱ्यांना सध्या जोड खतांची खरेदी करावी लागत आहे. मात्र यातील खतांची ऑनलाईन नोंदणी झाल्याशिवाय दुसरे घेता येत नाही. त्यामुळे या जोड खतांमागे व्यापारी, दुकानदार यांचे काही लागेबांधे आहेत असा सवाल करत खत विक्रेत्यांवर कारवाई कऱण्याची मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी …

Read More »

खरीप हंगामासाठी संरक्षित साठा तयार करा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

“येत्या खरीप हंगामात युरिया आणि डीएपी खताची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीने नियोजन करा. काळाबाजार करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार यांच्या तपासण्या करुन त्यांच्यावर कडक कारवाई करा. शेतकऱ्यांसाठी आवश्यक खतांचा संरक्षित साठा तयार करुन ठेवा,” असे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी यंत्रणेला दिले. खरीप हंगाम -२०२३ साठी युरिया आणि डीएपी …

Read More »

नाना पटोलेंची मागणी, खतासाठी शेतकऱ्याला जात विचारणाऱ्यावर कारवाई करा पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्याला जात विचारणे अत्यंत दुर्दैवी

शेतकऱ्याला जात नसते, सर्वांना अन्न पुरवणारा तो अन्नदाता आहे परंतु शेतकऱ्याला खत खरेदी करताना जात विचारली जात आहे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. भाजपाच्या राजवटीत शेतकऱ्यांची थट्टा केली जात असून जात विचारण्याच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. शेतकऱ्याला जात विचारली जाते या मुदद्यावर …

Read More »

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि खत पुरवण्याची जबाबदारी आता सहकारी संस्थांवर सहकारमंत्री अतुल सावे यांचे सहकारी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

कृषी-औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण क्षेत्रात सहकारी संस्थांची महत्वाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि वेळेत खत पुरवठा व्हावा, यासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री अतुल सावे यांनी केले. पणन महासंघ अधिमंडळाची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. त्यावेळी सहकार मंत्री सावे बोलत …

Read More »

बनावट खते, कीटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी बनावट खते, कीटकनाशके व बी-बीयाणे नियंत्रण संदर्भातील कायदा अधिक कडक करून त्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते व उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच नमुना तपासणीमध्ये वारंवार बनावट व निकृष्ट दर्जाची खते, कीटकनाशके विक्री करत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करून परवाने रद्द करण्यात यावेत असे निर्देश देऊन …

Read More »