Breaking News

Tag Archives: dy cm devendra fadnavis

मुख्यमंत्री शिंदेचा निर्णय; मराठवाड्यातील “या” जिल्ह्यांसाठी बोगद्यातून पाणी नेणार पश्चिम वाहिन्या नद्यांतून वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी प्रयत्न करा

वैनगंगा – नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबतचा आराखडा तयार करा. तसेच पश्चिम वाहिनी नद्यांतून वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी आवश्यक असणारा निधीची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. तसेच यासाठी खास बोगद्याच्या माध्यमातून हे पाणी वळविण्याबाबत विचार झाल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री …

Read More »

शिवसेना खासदार राऊत म्हणाले, ते काम एकनाथ शिंदे यांच्या आकलनापलीकडचे देवेंद्र फडणवीस यांच्या बुध्दीचार्तुयाचा अभिमान

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आले. मात्र शेवटपर्यत राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच जाईल असे वाटत असतानाच काही तास आधी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री पदावप एकनाथ …

Read More »

राष्ट्रवादीचा सवाल, तुम्ही सत्कारात व्यस्त; नैसर्गिक आपत्तीत लोकांनी करायचं काय ? प्रवक्ते महेश तपासे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंना सवाल

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव काल विधानसभेत जिंकला. त्यानंतर नागपूरात देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करत त्यांचा मोठा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यातच मागील …

Read More »

एकनाथ शिंदे यांनी ‘तो’ किस्सा सांगताच फडणवीसांनी लावला कपाळाला हात भेट कधी व्हायची याचा केला गौप्यस्फोट

विधानसभा अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा गटाने विश्वादर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनपर ठरावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी सांगितल्याप्रमाणे या बंडामागील अनेक कारणे आणि राजकिय प्रवासातील अनेक किस्से सांगत सभागृहात एकच हस्यकल्लोळ उडवून दिला. मी आणि फडणवीस कधी भेटायचो हे आमच्याही लोकांना माहिती नव्हते. सगळे झोपल्यावर मी …

Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे सगळे आले ते ईडीमुळेच… विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावावरील चर्चे दरम्यान केला गौप्यस्फोट

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचा ठराव मांडताना म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांकडे अंगुली निर्देश करत हे सगळे आलेत ते ईडीमुळे आलेत असे सांगत थोडा पॉज घेतला. त्यामुळे सभागृहात बंडखोर आमदारांसह सर्वच आमदारांमध्ये …

Read More »

विश्वासदर्शक ठराव शिंदे-फडणवीस सरकारने जिंकला: मविआला १०० ही अशक्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले अदृष्य “हाता”च्या मदतीचे आभार

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मांडलेला विश्वास दर्शक ठराव १६४ मतांनी आज जिंकत आपलेच सरकार आणि आपलीच शिवसेना असल्याचे एकप्रकारे सिध्द करून दाखवून दिले. तर १७० जणांचा पाठिंबा राहिलेल्या महाविकास आघाडीला १०० रीही गाठता आली नाही.  विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपा नेते सुधीर …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारने पहिली लढाई जिंकली: नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर राजन साळवी यांना १०७ मते मिळाली

शिवसेनेत बंडखोरी करून नवे सरकार स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आज संसदीय लढ्यातील पहिली लढाई जिंकली. नव्या राज्य सरकारला बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपालांच्या आदेशान्वये विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले. या अधिवेशनात विधानसभेच्या रिक्त अध्यक्षपदासाठी आज निवडणूक शिरगणतीनुसार घेण्यात आली. या निवडणूकीत …

Read More »

आपत्ती व्यवस्थापन बैठकीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले ‘हे’ आदेश काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

राज्यातील सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे म्हणजे यंत्रणेतील सर्व लोक देखील सतर्क राहतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील समिती सभागृहात …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते, यांची तर दोन चाकी स्कुटर; मात्र हँडल… हँडल असलेला व्यक्ती जिथे हवी तिथे स्कूटर नेणार

राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आले, तेव्हा त्याला तीन चाकांची ऑटोरिक्षा असलेले सरकार म्हणून संबोधण्यात आले. मात्र काल महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात आले. ही दोन चाकांची स्कूटर आहे. या सरकारमध्ये पुढे बसलेल्या माणसाकडे स्कूटरचे हँडल नसून मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात हँडल आहे तो जिथे हवी तिथे स्कूटर घेऊन जाईल …

Read More »