Breaking News

Tag Archives: devendra fadnavis

सुषमा अंधारे यांचा बावनकुळेंना सवाल, इतकी ताकद, ऐपत…मग फडणवीसांनी तुमचं तिकीट का कापलं? ४८ तासात मातोश्रीवर या आम्ही तुमचं स्वागत करू

ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केला. रोशनी शिंदे हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणावरच गुन्हा दाखल केला नाही, यावरून उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. …

Read More »

नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर टीका, ‘मोले घातले रडाया…’ ओळीतून फटकारत महाफडतूस माणूस तोंडाला आवर घालावा, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहावे

अडीच वर्षांच्या सत्ताकाळात राज्याला अधोगतीकडे नेणा-या,कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणा-या, गुन्हेगारांना मदत करणा-या निष्क्रीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल यापुढील काळात अनुचित उद्गार काढू नये , अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे असा इशारा ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सात निर्णयांना मान्यता नागपूर मेट्रो, देवनार डंपिंग ग्राऊंडवर वीज निर्मिती प्रकल्प, महावितरणच्या कर्जाला हमी यासह अन्य महत्वाच्या प्रस्तावांना मान्यता

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो, देवनार डंपिंग ग्राऊंडवर वीज निर्मिती प्रकल्प, महावितरणच्या कर्जाला हमी, नौदलाच्या सेलर इन्स्टिट्यूटसाठी भाडेपट्टीच्या नूतनीकरणास मंजुरी, अकृषी विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा, सातवा वेतन आयोग, उच्चशिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी परीस स्पर्श आदी महत्वाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. नौदलाच्या सेलर इन्स्टिट्यूटसाठी भाडेपट्टीच्या नूतनीकरणास …

Read More »

वाळू उत्खननातील ठेकेदारी संपुष्टात, सरकारचे उत्पन्न वाढणार, नागरिकांना स्वस्त दरात रेती अनधिकृत उत्खननाला आळा घालणाऱ्या नव्या रेती धोरणास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या नव्या धोरणामुळे राज्यातील वाळू उत्खनन क्षेत्रातील माफिया राज संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात …

Read More »

अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीसाठी राज्य सरकारने या निकषात केली दुरूस्ती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

“सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ‘अतिवृष्टी’ ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित …

Read More »

जयंत पाटील यांचे आव्हान,… तर गृहमंत्र्यांमध्ये दम आहे हे सिध्द होईल राष्ट्रवादीवर आरोप केल्याशिवाय काही लोकांचा दिवस जात नाही

राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज राष्ट्रवादी भवन येथे झाली. यामध्ये पक्षांतर्गत निवडणूक, पक्ष संघटना, पक्ष बांधणी यावर सविस्तर चर्चा झाली. शिवाय महाराष्ट्रात पक्ष बुथवर बांधण्यासाठी काही विभागीय नेते नेमण्यात आले असून आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत एक दिवसीय विभागीय शिबीरे घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा …

Read More »

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा, …तर कायमचे घरकोंबडा व्हावे लागेल पुन्हा देवेंद्रजींबद्दल बोलाल तर भाजपा घराबाहेर पडू देणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लाऊन निवडून आल्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा लाळघोटेपणा करून मुख्यमंत्रिपद मिळविणाऱ्या बेईमान आणि विश्वासघाती उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगतो की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा अशी व्यक्तिगत टीका केली तर भाजपा तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही, तुम्हाला कायमचे घरकोंबडा व्हावे लागेल, असा …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत फडतूस कोण?, तर नागपूरात पुष्पा स्टाईल …मै कारतूस है उध्दव ठाकरे यांच्या टीकेला दिले उत्तर

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून मारहाण झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. तसेच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा ‘फडतूस गृहमंत्री’ असा उल्लेख करत गृहमंत्रीपद झेपत नसेल तर राजीनामा द्या, असे आव्हान दिले. यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मंगळवारी ४ एप्रिल …

Read More »

उध्दव ठाकरे यांची खोचक टीका, कोणी तरी फडणवीसी करणारा फडतूस माणूस… घरावर काही आलं की एसआयटी अन् मिधे गटाच्या हल्ल्यावर फडणवीसी दाखविण्याच हिम्मत नाही

ठाण्यात ठाकरे गटाच्या एका महिलेला धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला पदाधिकाऱ्याने शिंदे गटाच्या महिलांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. या महिलेला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असताना त्याचदरम्यान उद्धव ठाकरेंनी ठाण्यात रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची नाबार्डला सूचना, शेतकऱ्यांच्या कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट लावू नका नाबार्डच्या बैठकीत पतधोरणावर बोलताना मुख्यमंत्र्यांची सूचना

“शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील या दृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी …

Read More »