Breaking News

Tag Archives: cm relief fund

सनदी अधिकारी राहुल पाटील यांनी होणाऱ्या पत्नीसोबत दिली कोरोना विरोधी लढ्याला मदत लग्न दिवसाची आठवण म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांचे सहकार्य

चंद्रपूर: प्रतिनिधी आज २ मे खरं तर सध्या कोरोना नसता तर राहुल दादा आणि तेजस्विनी वहिनी यांचा लग्नं समारंभ झाला असता. राहुल पाटील हे भारतीय वनसेवेत (IFS) चंद्रपूर येथे कार्यरत आहेत. अर्थात लग्न पुढे गेल्यामुळे खुप वाईट नक्कीच वाटतय. पण त्याहीपेक्षा या दोघांचं कौतुक जास्त वाटतय, त्याच कारणही तसंच आहे. …

Read More »

कोविड विरोधी लढ्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कर्मचारी मध्यवर्ती महासंघाकडून उपमुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांनी त्यासंबंधीचे पत्र आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द केले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य शासनाचे अधिकारी, …

Read More »

मंत्री गुलाबराव पाटीलांच्या खाजगी सचिवाचा असाही पुढाकार मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांची देणगी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यालयातील खाजगी सचिव अशोक सखाराम पाटील यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19, साठी एक लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द केला. कोविड विषाणू प्रार्दुभावाच्या विरोधात शासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी अधिकाधिक निधी देणगी म्हणून देण्यात यावा, …

Read More »

आईच्या १४ व्याचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला सामाजिक न्यायमंत्र्याच्या स्वीय सहायकाकडून सामाजिक जाणीवेच्या "गोड जेवण"चा आदर्श

मुंबई: प्रतिनिधी आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेंव्हा जाणवत नाही, आता नसलीच कुठे तरी नाही म्हणवत नाही… कविवर्य फ.मु. शिंदे यांच्या या कवितेतील भावना प्रशांत भास्कर जोशी आणि त्यांचे कुटुंबिय प्रत्यक्ष अनुभवत आहेत. नुकतेच  सामाजिक न्याय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या प्रशांत जोशी यांच्या आईचे म्हणजे सौ. इंदुबाई …

Read More »

कोरोनाच्या लढ्यासाठी मंत्रालयातल्या अधिकाऱ्याची अशीही दर्यादीली मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५१ हजाराचा वैयक्तीक सहभाग

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशावर आलेल्या कोरोना आजाराच्या संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्यादृष्टीकोनातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्रालयातील कार्यासन अधिकारी विष्णू पाटील यांनी तब्बल ५१ हजार रूपयांची वैयक्तीक मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. यासंदर्भातील ५१ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी …

Read More »

मुख्यमंत्री सहायता निधीच्या मदतीसाठी आता जीवनदायी भवनात अर्ज करा पर्यायी वैद्यकीय मदतीसाठी व्यवस्था कार्यरत

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी ही व्यवस्था सुरु करण्यात आली असून गरजू रूग्णांनी त्यासाठी वरळी नाका येथील जीवनदायी भवनातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या कार्यालयात करण्याचे आवाहन राज्यपालांच्या आदेशान्वये प्रशासनाने केले …

Read More »

पूरग्रस्तांसाठी देहव्यापारातील भगिनीही देणार दोन दिवसाची कमाई सांगली-कोल्हापूर-सातारा भागात मदत वाटप, श्रम कार्यास नगर मधून चमू रवाना

अहमदनगरः प्रतिनिधी राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली बरोबरच कर्नाटकातील बेळगावात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देहव्यापारातील भगिनींनीही पुढाकार घेतला आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या भगिनीकडून दोन दिवसांची कमाई मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती स्नेहालय परिवाराने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्तभागातील मदत कार्य चमूत …

Read More »