Breaking News

Tag Archives: amit deshmukh

मेडिकलची अंतिम वर्षाची परीक्षा नाही तर इंटर्नशिप नाही: केंद्रीय परिषदेची भूमिका येत्या ३१ जुलैला न्यायालयात राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडू- अमित देशमुख

मुंबई : प्रतिनिधी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंतिम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच घेण्यात येतील. तसेच  विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने इंटर्नशिप सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र यास केंद्रीय परिषदेने नकार दिल्याने येत्या ३१ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार …

Read More »

वैद्यकीय शिक्षणाच्या परीक्षांना पुन्हा ब्रेक परिस्थिती सुधारल्यावर परिक्षा घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता  अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात  याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना आज दिल्या. प्रथम द्वितीय तसेच …

Read More »

वैद्यकिय शिक्षण मंत्र्याचा ३८ हजार चाचण्यांचा दावा आरोग्य विभागाने ठरविला खोटा कोरोना चाचण्या कमी होत असल्याचे सरकारच्याच प्रसिध्दी पत्रकातच उघडकीस

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे धोरण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यासाठी राज्यात १०० प्रयोगशाळांची स्थापना केली. या प्रयोगशाळांमुळे राज्यात प्रतिदिन ३८ हजार चाचण्या होत असल्याचा दावा वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केला. परंतु प्रत्यक्षात १० लाखांमागे ७७१५ कोरोनाचाचण्या होत …

Read More »

वैद्यकीय परीक्षांचे नवे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार शासन निर्णय निर्गमित

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते, मात्र विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर करावे आणि दरवर्षीप्रमाणे दोन पेपर मध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्यात …

Read More »

१०० व्या लॅबचे उद्घाटन, आता दिवसाला ३८ हजार चाचण्या होणार राज्यातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यास प्राथमिकता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात विविध उपाययोजना करण्यात येत असून दर्जेदार आरोग्य सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. मात्र, भविष्यात कोरोना विषाणूसारखे कोणतेही संकट आले तरी राज्याची आरोग्य यंत्रणा तत्पर करुन ती अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य सुविधांना प्राधमिकता देण्यात येत आहे. निरोगी, सशक्त महाराष्ट्र करण्यावर भर असून त्यासाठी हे …

Read More »

मेडिकलच्या परिक्षा १५ जूलै ते १५ ऑगस्ट किंवा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर मध्ये होणार वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या आराखड्याला राज्यपालांची मंजूरी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे. तरीही विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने १५ जुलै पासून किंवा १६ ऑगस्टपासून परिक्षा घेण्याचा आराखडा तयार केला. या आराखड्यास राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय …

Read More »

राज्यात ५२ हजार कोरोनाग्रस्तांपैकी ३५ हजार रूग्ण अॅक्टीव्ह २ हजार ४३६ नवे रूग्ण, ६०जणांचा मृत्यू तर १५ हजार बरे होवून घरी

मुंबई: प्रधिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कालच्या तुलनेत २ हजार ४३६ ने आज वाढ झालेली असली तरी प्रत्यक्षात ३५ हजार १७८ रूग्ण अॅक्टीव्ह आहेत. तसेच ११८६ जणांना आज घरी सोडण्यात आल्याने बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या १५ हजार ७८६ इतकी झाली असून ६० जणांचा २४ तासात मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री …

Read More »

३ हजार रूग्णांच्या विक्रमी संख्येसह राज्य पोहोचले ५० हजारांवर तर अॅक्टीव केसेस अवघ्या ३३ हजार: ५८ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आजपर्यंतचे सर्वाधिक रूग्ण अर्थात ३ हजार ४१ रूग्ण राज्यात आढळून आले असून महाराष्ट्राने ५० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार केला. तर मुंबई शहराची संख्या ३० हजार ५४२ वर पोहोचली आहे. ५८ रूग्णांचा मृत्यू झाला तर ११९६ रूग्णांना घरी सोडून दिल्याने त्यांची संख्या १४ हजार ३०० वर …

Read More »

आतापर्यंतची सर्वात मोठी विक्रमी रूग्णसंख्या मुंबईसह राज्यात तब्बल २९४० रूग्णांपैकी २२४९ एकट्या मुंबईत: राज्याची संख्या ४४ हजार ५०० वर

मुंबई: प्रतिनिधी मागील २४ तासात राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून आतापर्यंतची सर्वाधिक २ हजार ९४० रूग्णांचे निदान झाले. यापैकी मुंबईत २२४९ रूग्णांचे निदान झाले. तर ६३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या संख्या १५१७ वर पोहोचली आहे. राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ४४ हजार ५८२ वर पोहोचली तर आज ८४० …

Read More »

रूग्ण संख्या पोहोचली ३९ हजारावर तर घरी गेले १० हजाराहून अधिक कोरोनाचे आज २२५० नवे रुग्ण; तर ६५ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार २९७ झाली आहे. आज २२५० नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६७९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १० हजार ३१८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे …

Read More »