Breaking News

Tag Archives: aditya thackeray

वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यात झोल मुंबईतील ९२७ खड्डे बुजवायला ४८ कोटी?-भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील सुमारे २ हजार किमी च्या रस्त्यावर केवळ ९२७ खड्डे आहेत असे महापालिका सांगते आहे. मग खड्डे भरण्यासाठी जे ४८ कोटींची तरतूद केली ती याच ९२७ खड्यांसाठी का? असा उपरोधिक सवाल करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यात झोल …

Read More »

भाजपाच्या टीकेनंतरही नीती आयोगाने केले कौतुक : मुंबईसह या प्रश्नी आश्वासन केंद्राकडील राज्याच्या प्रलंबित विषयांना त्वरेने मार्गी लावणार

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या २ ऱ्या लाटेनंतर संभावित ३ ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने काही निर्बंध राज्यातील जनतेवर लादत अनेक गोष्टी खुल्या केल्या. मात्र या निर्बंधावरून भाजपा नेत्यांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक नीती आयोगाने केले. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकवर आणण्यासाठी …

Read More »

महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केंब्रिज विद्यापीठ तयार करणार अभ्यासक्रम केंब्रिज आणि महापालिकेदरम्यान मुंबईत आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सहमती- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी देशात आणि जगात जे सर्वोत्तम असेल त्या पद्धतीचे शिक्षण मुंबईतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. भविष्यात राज्य शासनामार्फत राज्यातील विद्यार्थ्यांना असे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, देव केवळ मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये नाही… नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा साज घेत काळाप्रमाणे बदलणाऱ्या या संस्थेला राज्य सरकारच्या वतीने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे करत आज मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद आहेत, देव केवळ मंदिरे आणि …

Read More »

“वातावरणात बदल” नेमके काय झाले? जाणून घ्या आयपीसीसीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळात अहवाल सादर

मुंबई: प्रतिनिधी मागील एक वर्षापासून राज्यातील कधी नव्हे इतकी अतिवृष्टी, या अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटना, ऋतुंमध्ये होत असलेले बदल यापार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीत असलेल्या इंट्रा गर्व्हमेंट पॅनल ऑन क्लाईमेंट चेंज अर्थात वातावरणीय बदलावरील आंतर सरकारी पॅनलने एक अहवाल तयार केला. या अहवालातील ४० पानांचा सारांश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला. तो …

Read More »

‘मिठी’ होणार गटारमुक्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी गाळ काढणे, तरंगता कचरा वेगळा करणे तसेच आजूबाजूने येणारे घाण पाणी रोखणे या तीन टप्प्यांमध्ये काम करून ‘मिठी’ ला नदीचे मूळ स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकामी सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. मिठी नदी स्वच्छतेच्या पायलट प्रकल्पाचे …

Read More »

मुंख्यमंत्री म्हणाले, जबाबदारीचं भान ठेवून लोकलचा निर्णय घेणार महापालिकेच्या एच पश्चिम वार्डच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी वक्तव्य

मुंबई: प्रतिनिधी मुंबईकरांची दैंनदिन गरज असलेल्या मुंबई लोकल प्रवास सुरु करण्यावरून एकाबाजूला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. मात्र न्यायालयाने फटकारल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जबाबदारीचं भान ठेवून लोकलबाबचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करत लोकल सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचे स्पष्ट केले. संकटाचा सामना करतानाच विकास कामे सुरु ठेवण्यात येत असल्याचे सांगत …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना दबंग स्टाईलमध्ये उत्तर, “थप्पड…….झापड” बीडीडी चाळकऱ्यांचे घराचे काम वेगाने पूर्ण करण्याची दिली ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी भाजपाच्या एका नेत्याने नुकतेच प्रसंगी शिवसेनाभवनची तोडफोड करण्याची चिथावणी खोर वक्तव्य केले त्याचाच धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सतेजजी आपण घराबाबत ‘डबल सिट’ या चित्रपटाचा उल्लेख केलात, पण आपली तर ट्रिपल सिट आहे. हे ट्रिपल सिट सरकार आहे, हे मुद्दामून बोलतो कारण आतापर्यंत टीका अनेकांनी …

Read More »

पर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी उपलब्ध होणार तारांकीत दर्जाच्या सोयी-सुविधा

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) पर्यटक निवासे आणि मोकळ्या जागा या निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय पर्यटनस्थळांच्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी येत असलेल्या पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानिक व्यावसायिक, युवकांना रोजगार उत्पन्न होवून पर्यटनस्थळाचा सर्वागिण विकास व्हावा यासाठी एमटीडीसीने पुढाकार घेतला आहे. याठिकाणी पंचतारांकित दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार …

Read More »

बीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द ? पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे कार्यक्रम रद्द होणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे आणि दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमुळे वरळी येथील बीडीडी चाळीच्या पुर्नविकास प्रकल्पाचे दुसऱ्यांदा होणारा भूमिपूजन कार्यक्रम रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालय आणि गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईच्यादृष्टीने महत्वाचा असलेल्या बीडीडी चाळींच्या पुर्नविकास प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ …

Read More »