Breaking News

Tag Archives: राहुल गांधी

राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ पक्का अमेठीतूनच लढणार निवडणूक

देशातील लोकसभा निवडणूकांचा कालावधी आता जवळ आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील सहयोगी पक्ष असलेल्या उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाची चर्चा जाहिरही करण्यात आली. यावेळी अमेठी आणि रायबरेलीत आणि वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसकडून उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मागील …

Read More »

शरद पवार यांचा आरोप, व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम सुरुय…

सध्या कोल्हापूर आणि पुणे दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार याच्या गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन आणि प्रसारमाध्यमात दाखविण्यात येणाऱ्या बातम्यांच्या प्रश्नीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर खोचक टीका केली. कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

भाजपाच्या अधिवेशनात नरेंद्र मोदी यांच्याकडून किमान डजनवेळा तरी काँग्रेसचे नाव

भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह देशभरातील भाजपाचे खासदार, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक वरिष्ठ राजकिय नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना म्हणाले, मागील ६५-७० वर्षाच्या काळात काँग्रेसचा एकही पंतप्रधान …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, बॉण्ड प्रकरणी न्यायालयाचा निर्णय म्हणजे मोदींच्या भ्रष्ट धोरणाचा पुरावा

इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने इलेक्टोरल बॉण्ड जारी करणे परस्पर कायद्याचे उल्लंघन होत असल्याने बॉण्ड योजनाच बेकादेशीर ठरविण्याचा निकाल दिला. त्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे मोदीच्या भ्रष्ट धोरणांचा उघड पुरावा असल्याची टीका केली. राहुल गांधी यांनी मागील काही काळापासून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गॅरंटी, आम्ही देऊ एमएसपी…

देशातील शेतकऱ्यांच्या शेत मालाला एमएसपी अर्थात आधारभूत किंमत मिळावी म्हणून पंजाब, हरियाणामधील सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात चलो दिल्ली आंदोलन पुकारले. तसेच केंद्र सरकारकडून आधारभूत किंमतीबाबतचा निर्णय जाहिर केल्याशिवाय माघारी फिरायचे नाही असा निश्चय करून दिल्लीच्या दिशेने शेतकरी मोर्चा निघाला. मात्र केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यावर …

Read More »

अतुल लोंढे यांचा खोचक सल्ला, भाजपाने बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल आंदोलन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कागदी ओबीसी आहेत, जन्माने नाहीत या खासदार राहुल गांधी यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्षाने जो गोंधळ घातला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा गुजरातच्या वर्तमान पत्रांमध्ये ‘उच्चजातीचा’ व्यक्ती मुख्यमंत्री झाला, अशा पानभर जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. नंतर मोदींनी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र …

Read More »

राहुल गांधी यांची घोषणा, आदिवासींचा जल, जंगल, जमिनचा हक्क काँग्रेस देणार

मणिपूरमधून १४ जानेवारी रोजी निघालेली राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा आज झारखंड राज्यातील बुखारो-धनबाद जिल्ह्यात पोहोचली. बुखारो धनबाद जिल्हा हा कोळसा खाणी आणि स्टील प्लॅन्टसाठी जगभरात प्रसिध्द आहे. मात्र पहिल्यांदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा धनबाद जिल्ह्यात पोहोचताच तेथील जनतेशी संवाद साधताना राहुल गांधी …

Read More »

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पोहोचली बिहारमध्ये, भाजपावर टीकास्त्र

नुकतेच बिहारमधील इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा आज बिहारमध्ये प्रवेशली. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर टीकास्त्र सोडताना मात्र मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर यु टर्नच्या भूमिकेवर कोणतेही भाष्य करण्याचे टाळले. राहुल …

Read More »

नितीशकुमार यांच्या त्या वक्तव्याने इंडिया आघाडीच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील शिवसेना पक्षात बंडखोरी घडवून आणत एका पक्षाचे दोन पक्ष करण्यात आले. तोच प्रकार बिहारमधील भाजपाचा एकेकाळचा सहकारी पक्ष असलेल्या जनता दल युनाटेडसोबतही करण्यात आल्याचा प्रकार स्वतः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी उघडकीस आणला. त्यानंतर भाजपाच्या पराभवासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याची किमया साधण्यातही नितीशकुमार यांनी साधली. मात्र …

Read More »

राहुल गांधी यांनी ठणकावले, आणखी ५० गुन्हे दाखल करा, मी घाबरत नाही

मणिपूरहून १४ जानेवारी २०२४ रोजी झालेली भारत जोडो न्याया यात्रा उद्या पश्चिम बंगालमध्ये पोहोचत आहे. दरम्यान आसाममधील यात्रेच्या प्रवासा दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सरमा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर विविध कलमांखाली जवळपास ५० गुन्हे दाखल केले. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी येथील जाहिर सभेत बोलताना भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ …

Read More »