भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह देशभरातील भाजपाचे खासदार, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक वरिष्ठ राजकिय नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना म्हणाले, मागील ६५-७० वर्षाच्या काळात काँग्रेसचा एकही पंतप्रधान अरब राष्ट्रात गेला नाही, की त्याचे फारसे स्वागत झाले नाही. मात्र मी अरब राष्ट्रांमधील सर्व देशात गेलो. तेथील प्रत्येक देशाने मला त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले. पण तो गौरव माझ्या एकट्याचा नाही तर देशातील १४० कोटी देशवासियांचा असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने देशाची सत्ता फक्त आपल्या घरातच कशी राहिल आणि आपल्याच परिवारातील लोकांना कसे महत्व प्राप्त राहिल यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच इतर त्या वेळच्या मोठ्या नेत्यांच्या कामांकडे लक्षच दिले नाही. कपु्री ठाकूर सारख्या महान व्यक्तीला केंद्रातील भाजपा सरकारने भारतरत्न पुरस्कार दिल्यानंतर त्यांची आठवण काँग्रेसला झाली असेही म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले, देशातील महत्वाची पदे फक्त काँग्रेस परिवारातील घरच्या व्यक्तींकडेच कशी राहतील याकडेच काँग्रेसने लक्ष दिले. त्यामुळेच काँग्रेसच्या राजवटीत फक्त देशाचा विकास झाला नाही तर अतोनात नुकसान देखील झाले. विकासाच्या मुद्यावरून काँग्रेस नेहमीच लांब राहिली. ज्यावेळी हे सत्तेत होते. त्यावेळी लोक त्यांना हात मिळवायला पहात होती. परंतु आज त्यांना हात मिळविणारे कोणी नसल्यानेच तेच आता जनतेमध्ये जाऊन हात मिळवू पहात अशी उपरोधिक टीका राहुल गांधी यांचे नाव न घेता केली.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, मागील १० वर्षाच्या कालखंडात देश विकासाच्या वाटेवर असून पुढील पाच वर्षात देश विकसित राष्ट्र बनणार म्हणजे बनणारच. त्यासाठी भाजपाला लोकसभेत तिसरी संधी हवी आहे. त्यामुळेच आपले विरोधक असलेले काँग्रेसमधील अनेक नेत्यांना कळून चुकले आहे की त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही. त्यामुळे ते आपल्यात सहभागी होऊ इच्छितात. त्यांना भाजपाने सुरु केलेल्या विकासाच्या अभियानात सहभआगी व्हायचे आहे. त्यामुळेच ते इकडे येत आहेत. परंतु काँग्रेसकडे कोणताही देशाच्या विकासाचा आणि महासत्ता बनविण्याचे लक्ष्य नसल्यानेच त्यांच्याकडील नेते आपल्याकडे येत असल्याचा आरोपही यावेळी केला.
शेवटी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, भाजपाच्या प्रत्येक बुथ परिसरातील लाभार्थ्यांच्या घरी जा त्यांना सांगा मी देशाचा प्रधानसेवक नरेंद्र मोदींकडून आलोय आणि त्यांना भाजपाकडून केलेल्या कामांची यादी वाचून दाखवा. त्यासाठी नमो अॅपची तुम्हाला मदत होईल. त्यासाठी प्रत्येक बुथ स्तरावरील कार्यकर्त्याच्या माध्यमातून पुढील १०० दिवसांचा कार्यक्रम आखून प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचा आणि ३७० जागा आगामी निवडणूकीत मिळवाव्याच लागतील असे सांगत तशा पध्दतीने कामाला लागा असे आवाहनही केले.
तसेच देशातील तमाम गरिब कुटुंबाना पुढील पाच वर्षे मोफत धान्य मिळावे आणि देशाला मोठी अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी म्हणून प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचण्याचे आवाहन यावेळी केले. विशेष म्हणजे यावेळी भाजपाच्या अधिवेनात अबकी बार मोदी सरकार नव्हे तर भाजपा सरकार ४०० पार अशा नव्या घोषणा भाजपाच्या कार्यकर्त्ये आणि नेत्यांकडून एकायला मिळाल्या.
भाजपा कार्यकर्ताओं की निष्ठा और समर्पण से हमें जनता-जनार्दन का भरपूर आशीर्वाद मिल रहा है। 2024 में तीसरी बार सरकार बनाकर हम जनसेवा और राष्ट्र सेवा का अप्रतिम इतिहास रचने जा रहे हैं। नई दिल्ली में भाजपा राष्ट्रीय अधिवेशन को संबोधित कर रहा हूं। https://t.co/aCtRU51Thy
— Narendra Modi (@narendramodi) February 18, 2024