Breaking News

Tag Archives: महाराष्ट्र

महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती दोलायमान, शासनाचे कर्ज रोखे विक्रीस दहा वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३३ च्या दहा वर्षे मुदतीच्या २ हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.४६ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार …

Read More »

महाराष्ट्र आणि काश्मिरच्या नव्या मैत्री पर्वाला सुरूवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे श्रीनगर येथे आगमन झाले. सरहद संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हम सब एक है या कार्यक्रमासह कारगिल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन, युद्ध स्मारकाला भेट, जवानांशी आणि काश्मीर मधील मराठी कुटुंबियांशी संवाद आदी कार्यक्रम आयोजित …

Read More »

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र “भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था” स्थापन करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांची मागणी मान्य

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी देशातील पहिली राज्यस्तरीय “भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था” स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांच्या मागणीवर दिली आहे. महाराष्ट्रात पावसाळयात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीन, तळीये नंतर या पावसाळयात खालापूर येथील इर्शाळवाडी येथे भूस्खलन होऊन शेकडो …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मराठा आरक्षणाबद्दल फडणवीस जाणीवपूर्वक दिशाभूल करतात राज्यातील तिघाडी सरकारकडून मराठा आरक्षणप्रश्नी वेळकाढूपणा

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच चिघळवला आहे. भाजपा आरक्षण विरोधी पक्ष आहे त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. केंद्रात ९ वर्षांपासून भाजपाचे सरकार आहे पण त्यांनी निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपाची प्रामाणिक इच्छा असेल तर संसदेच्या विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय …

Read More »

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि दुष्काळग्रस्त भागातील प्रकल्पांना मदत द्या गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रिय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज अहमदाबाद येथील गांधीनगर येथे पश्चिम …

Read More »

आधी महाराष्ट्रात कॅसिनो कायद्यावरून मनसेच्याबाजूने, तर आता चक्क रद्दच गरज सरो आणि वैद्य मरो, भाजपाची खेळी

राज्यात ऑनलाईन गेमवरील जीएसटी आणि ऑनलाईन जुगारावरून राज्यातील सामाजिक वातावरण चांगलेच तापलेले असताना मनसेकडून राज्यात गोव्याच्या धर्तीवर कॅसिनो कायदा तयार करून लागू करण्याची मागणी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेच्या मनोज चव्हाण यांच्याकडून करण्यात आली. त्यावेळची राजकिय गरज म्हणून भाजपाचे निष्ठावंत नेत्यांकडून सातत्याने या कायद्याची पाठराखणही करण्यात आली. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास, आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण

महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबध्द होऊया आणि प्रयत्नशील राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करा ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी

देशात ओबीसीला आरक्षण १९९० पासून बी.पी. मंडल आयोगामुळे लागू करण्यात आले. भाजपा सरकारने आरएसएसच्या मनुवादी संस्कृतीच्या दबाव तंत्रामुळे ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मोहीम आखल्याचा आरोप ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात ओबीसी जनगणना करण्यात आली. त्यामध्ये ओबीसीचा डाटा देण्यासंदर्भात वेळ काढून धोरण …

Read More »

नाना पटोले यांची माहिती, … काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढणार लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा विधानसभानिहाय आढावा घेणार

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल …

Read More »

विकासनिधीच्या वाटप आणि कामाचे कंत्राट परराज्यातील ठेकेदारांना राज्यात वाढतेय नाराजी

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना आंध्र आणि कर्नाटकातील अनेक ठेकेदारांच्या वाऱ्या मंत्रालयात सुरु झाल्या होत्या. परंतु पुन्हा भाजपाचे सरकार येताच दिल्ली आणि गुजरातस्थित राज्यातील ठेकेदारांची वर्दळ पुन्हा एकदा मुंबईत सुरु झाल्याचे चित्र सुरु झाले. यापार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील स्थानिक कंत्राटदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण होण्यास सुरुवात झाली …

Read More »