Breaking News

Tag Archives: नागपूर

या प्रश्नांवर काँग्रेसचा नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’मोर्चा महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार

राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व …

Read More »

ऑनलाइन फसवणुकीच्या जलद प्रतिसादासाठी ‘डायनॅमिक प्लॅटफॉर्म’ तयार करणार

राज्यामध्ये ॲप, संकेतस्थळे, विविध समाज माध्यम ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. यामध्ये बरेचसे ॲप विदेशातून संचालित करण्यात येत आहे. अशा ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी सर्वंकष असा ‘डायनॅमिक (गतिमान) प्लॅटफॉर्म’ तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून जलद प्रतिसाद मिळण्याची व्यवस्था होणार आहे. ही सर्व व्यवस्था एका ॲपमध्ये …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, …नवाब मलिक देशद्रोही तर मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण?

माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. नवाब मलिक चालत नाहीत तर मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधीत प्रफुल्ल पटेल फडणवीसांना कसे चालतात? असा सवाल करुन फडणवीस यांचे देशप्रेम नकली आहे, अशा नकली देशप्रेमाची …

Read More »

निवासी आश्रमशाळांमधील २८२ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण ९७७ खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी २२५ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी आतापर्यंत १८० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या आश्रमशाळांमध्ये एकूण २ लाख २३ हजार विद्यार्थी शिक्षण …

Read More »

कर्जावरून नाना पटोले यांचा सवाल, पण शेतकऱ्यांनाच पैसे देण्यास टाळाटाळ का ?

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटाला तोंड देत असताना राज्य सरकारची भूमिका मात्र वेळकाढूपणाची दिसत आहे. शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची परिस्थिती आली आहे. सरकार फक्त भरपूर दिले भरपूर दिले अशा घोषणा करते पण शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही. सरकार सभागृहात चर्चा करण्यास तयार आहे तर मग चर्चा का घेत नाही. सभागृहात आज शेतकरी प्रश्नांवर …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल, … सरकार असंवेदनशील

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही, असा घनाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला, चहापानाच्या ऐवजी पान सुपारी…

पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निमित्ताने विरोधकांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत होते. मात्र निवडणूकांचे निकाल लागताच विरोधी पक्षांच्या आघाडीतच फाटाफुट झाल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहता हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांकडून सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. मात्र चहापानाच्या कार्यक्रम हा चर्चा करण्यासाठी असतो. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेत काही जण झोपले होते. त्या झोपेतच हे …

Read More »

अंबादास दानवे यांचा इशारा,… याप्रश्नावरून हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरणार

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर व शेतकरी आत्महत्या, सरकारी खात्यात वाढलेला भ्रष्टाचार, ड्रग्स माफिया, बेरोजगारी आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था या प्रमुख मुद्द्यांवर गुरुवार ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरणार असल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अंबादास दानवे म्हणाले की, …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, सरकारच्या चहापानाला जाणे, हा संकटातील शेतकऱ्याप्रती द्रोह

राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे. शेतकऱ्यांची ही दुर्देवी परिस्थिती असताना सरकारने चहापानाचा कार्यक्रम टाळायला हवा होत. हा कार्यक्रम टाळला असता तर शासन शेतकऱ्यांबरोबर असल्याचा दिलासा राज्यातील शेतकरी, शेतमजूर यांना मिळाला असता. दुर्देवाने …

Read More »

राज्य विधिमंडळाचे १० दिवसांचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये

लोकसभा निवडणूकीच्या पाच महिने आधी होत असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांकडे लोकसभा निवडणूकीपूर्वीची लिटमस टेस्ट म्हणून पाहण्यात येते. या पाच विधानसभा निवडणूकांची मतमोजणी ३ डिंसेबर रोजी होत आहे. या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशातील लोकसभा निवडणूका नियोजित होणार वेळेत होणार की, त्यासोबत …

Read More »