Breaking News

राज्य विधिमंडळाचे १० दिवसांचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये

लोकसभा निवडणूकीच्या पाच महिने आधी होत असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांकडे लोकसभा निवडणूकीपूर्वीची लिटमस टेस्ट म्हणून पाहण्यात येते. या पाच विधानसभा निवडणूकांची मतमोजणी ३ डिंसेबर रोजी होत आहे. या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशातील लोकसभा निवडणूका नियोजित होणार वेळेत होणार की, त्यासोबत वन नेशन वन इलेक्शन या तत्वानुसार महाराष्ट्र विधानसभा बरखास्त करून लोकसभेच्या निवडणूकांसोबत होणार याबाबत अंतिम निर्णय झालेला नसला तरी तशी चर्चा मात्र रंगली राजकिय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. त्यातच राज्यघटनेतील तरतूदीनुसार राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येणार असून गुरुवार ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत फक्त १० दिवसांसाठी होणार आहे.

आज सकाळी विधानभवन येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विविध विभागाचे मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशन गुरुवार ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. हिवाळी अधिवेशनाचे एकूण दिवस १४ असून, यामध्ये प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, तर सुट्या (शनिवार व रविवार मिळून) ४ दिवस आहेत.

दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहांचे दोन्ही प्रधान सचिव आणि शिंदे गट, ठाकरे गटाचे बहुसंख्य आमदार सुनावणीच्या कामानिमित्त मुंबईतच थांबणार आहेत. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सर्व राजकिय कार्यक्रम आटपून विशेष विमानाने नागपूरला जाणार हिवाळी अधिवेशनासाठी जाणार आहेत.

Check Also

आमदार थोरवे आणि मंत्री भुसे यांच्यात धक्काबुक्की; असे काही नाही झालं मंत्र्यांचा खुलासा

राज्यातील शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाच्या विरोधात अनेक आमदार-खासदारांनी बंडाचे निशाण फडकावित भाजपाच्या मदतीने वेगळी चूल मांडली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *