राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर ३४ रूपये दर मिळावा यासाठी कॉम्रेड डॉ अजित नवले यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरु केले. तसेच याप्रकरणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही डॉ अजित नवले यांच्या उपोषणाच्या आंदोलनस्थळाला भेट देत पाठिंबा देत सरकार दरबारी अजित नवले यांचे म्हणणे पोहोचविण्यासाठी विजय वडेट्टीवार यांना सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दूध दर प्रश्नी दूध संघाने निश्चित केलेला दर देण्यासाठी सहकार्य करावे आणि राज्य सरकारनेही याप्रश्नी कारवाई करावे असे आवाहन केले.
शरद पवार यांनी आज यासंदर्भात ट्विट करत बोलताना म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दराच्या प्रश्नांवर डॉ. अजित नवले व इतर कार्यकर्त्यांची बेमुदत उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने १४ जुलै २०२३ रोजी अध्यादेश काढून गाईच्या दूधाला किमान ३४ रुपये प्रति लिटर निश्चित करूनही सदर आदेशाचे पालन दूध संघांकडून होत नाही असे दिसते. या संदर्भात शासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. व त्यासाठी दूध संघानेही सहकार्य करावे, अशी मागणी केली.
तसेच शरद पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, उपोषणकर्ते शेतकरी नेते डॉ. अजित नवले व त्यांच्या सहकाऱ्यांना आवाहन की त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, उपोषण मागे घ्यावे. शासनाबरोबर चर्चेतून आपण मार्ग काढू. दूध उत्पादक शेतकरी बांधवांना देखील विनंती की, त्यांनी दूधासारखा नाशवंत माल रस्त्यावर ओतून आणखी नुकसान करून घेऊ नये. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे कृपया लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीचे अंमलबजावणी करून घ्यावी अशी सूचनाही केली.
आवाहन
गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दराच्या प्रश्नांवर डॉ. अजित नवले व इतर कार्यकर्त्यांची बेमुदत उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ जुलै २०२३ रोजी अध्यादेश काढून गाईच्या दूधाला किमान ३४ रुपये प्रति लिटर निश्चित करूनही सदर आदेशाचे पालन दूध संघांकडून होत नाही असे… pic.twitter.com/aGi0kRGr58
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 28, 2023