Breaking News

Tag Archives: एकनाथ शिंदे

आता जलविद्युत प्रकल्पातही खाजगी भागिदारीचे धोरणः राज्य सरकारचा निर्णय मोठी खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येण्याचा राज्य सरकारचा दावा

सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी (Pumped Storage Projects) स्वतंत्र धोरण राबवून मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूकीला जलविद्युतमध्ये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात १० हजार ७५७ मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन झाले आहे. २०२५ पर्यंत ही ऊर्जा क्षमता २५ हजार मेगावॅटपर्यंत …

Read More »

टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंना आली जाग, आरोग्य यंत्रणेचे व्हिजन २०३५ जाहिर ३४ जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचे निर्देश

राज्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकिय रूग्णालयात नुकत्याच झालेल्या रूग्णांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड सर्वचस्तरातून उठविण्यात येत आहे. तसेच विविध राजकिय पक्षांकडूनही टीका सातत्याने करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्य यंत्रणेच्या कायापालटाबाबत व्हिजन २०३५ जाहिर केले. राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, ‘शासन आपल्या दारी आणि लोकं देवाघरी’ अशी शिंदे सरकारची कार्यशैली शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही चार्टर्ड विमानवाल्याचे सरकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावर सरकारी तिजोरीतून मोठा खर्च करण्यात आला. रिक्षावाले मुख्यमंत्री अल्पावधीत चार्टर्डवाले झाले आहेत. २०१५ च्या दावोस दौऱ्यावर ६२ लाख २८ हजार रुपये खर्च झाला होता तोच जानेवारी २०२३ च्या दौऱ्यावर ३२ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असून …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा भाजपावर निशाणा, आमदार विकत घ्यायला पैसै, मात्र रूग्णालयासाठी पैसे नाहीत नांदेड येथील रूग्णालयातील मृत्यूवरून सरकारला करून दिली आठवण

राज्यातील दोन तीन जिल्ह्यात मृत्यू संख्या वाढल्याचे दिसत होत त्याला काही कारण असू शकतात पण यात राजकारण न करता मार्ग काढावे लागतील. हेच डीन, डॉक्टर, नर्स असताना कोरोना काळात जगाने आपल कौतुक केले. हे उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. काय कमी राहत आहे याची कारणं शोधावे लागेल असे युवासेना नेते आदित्य …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून “या” तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांचा समावेश

राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची आज बैठक झाली. या बैठकीत श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग विकासाच्या २८६.६८ कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास, श्री क्षेत्र घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राच्या सुधारित १६३ कोटी आणि श्री क्षेत्र सप्तश्रृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या ८१.८६ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता? ट्रिपल इंजिन सरकार विरोधात जनमानसात प्रचंड असंतोष

विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून टाकली आहे. राज्यातल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे, गाडी चालवणे आणि प्रवास करणे, हे जीवावर बेतणारे आहे. रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष देतो, रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यावर जर मार्गच काढायचा नसेल तर तोल कशाचा घेता असा …

Read More »

काँग्रेसची मागणी, राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा मुख्यमंत्र्यांनाही लिहिले पत्र

राज्याच्या आरोग्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे, सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव झाले. ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध पुरवठ्याची स्थिती काय होती? यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला? या प्रश्नांची खरी खरी उत्तरे महाराष्ट्राला हवी आहे. सरकारने आरोग्याची श्वेतपत्रिका काढून …

Read More »

अजित पवार म्हणाले, खरं तर हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत येतो पण… सप्तश्रृंगी गडाच्या ८१ कोटी ८६ लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजूरी देणार

वास्तविक पाहता हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येतो. पण मी तुम्हाला शब्द देतो की, मी उद्याच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून बैठक घ्यायची विनंती करून सप्तश्रुंगी गडाच्या विकासासाठी ८१.८६ लाख रूपयांच्या निधीस मंजूरी देतो. आणि तसे पत्र तुम्हाला दिसेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित …

Read More »

लोक उपचाराअभावी मरत असताना मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा कसल्या करता? प्रदेश काँग्रेसच्या कोकण विभागाची आढावा बैठक नवी मुंबईत संपन्न

काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून देशातील सद्य राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याची भावना जनतेत आहे. काँग्रेसचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी ब्लॉक स्तरावर, मंडल स्तरावर व ग्राम स्तरावर पक्षाची संघटनात्मक बांधणी किती झाली आहे याचा आढावा घेण्यासाठी विभागीय बैठका घेतल्या जात आहेत, अशी माहिती …

Read More »

दिल्ली भेटीत मुख्यमंत्री शिंदेंकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरे विकास मंत्री यांची भेट

वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ‘ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प’ काळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ६ ऑक्टोंबर रोजी केंद्रीय शहरे विकासमंत्र्यांसमोर मांडला. …

Read More »