Breaking News

रेल्वे मंत्रालयाचे मुंबई महाराष्ट्राबाबतचे ते पत्र दाखवित मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल… रेल्वे स्टेशन स्थानकातील मोदींच्या ३डी फोटो सेल्फी पॉंईटची माहिती RTI मधून उघड

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये पाच पैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या ताब्यातील तीन मोठी राज्ये भाजपाने हिसकावून घेतली. त्यानंतर भाजपाने सरकारी योजना आणि सरकारी मालमत्तांचा वापर नरेंद्र मोदी पर्यायाने भाजपाच्या प्रचारासाठी वापरण्याचे धोरण स्विकारल्याचे दिसून येत आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ५० रेल्वे स्थानकांवर जनतेच्या पैशातून नरेंद्र मोदी थ्री डी प्रतिमेसोबत सेल्फी पॉंईट तयार करण्यात आले असून हे सर्व जनतेच्या पैशातून रेल्वे स्थानकात उभारण्यात येत असल्याची माहिती RTI कायद्यांतर्गत करण्यात आल्याची माहिती पुढे आली असून यासंदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी एक्स वर ट्विट करत सवाल उपस्थित केला.

आगामी लोकसभा निवडणूकांच्यादृष्टीने देशातील मोठमोठी राज्ये काहीही करून जिंकण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षातील प्रभावशाली नेत्यांवर आधी भ्रष्टाचाराचे आधी आरोप करायचे आणि त्यानंतर भाजपासोबत येण्यासाठी बाध्य करायचे आणि एकदा ते सोबत आले की तपास यंत्रणांचा ससेमिराही शांत होतो अशी चर्चा राजकिय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने होत आहे. मात्र या चर्चांना कधी भाजपाने पूर्णविराम दिला ना कधी केंद्रीय तपास यंत्रणांनी दिला.

त्यातच आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपाने लोकसभेत काहीही करून ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने कोणत्याही गोष्टींचा इव्हेंट करत आहेत. तसेच महाराष्ट्रात भाजपामय बनविण्यासाठी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्यासाठी मुंबई डिव्हीजन, नागपूर डिव्हीजन, भुसावळ डिव्हीजन, सोलापूर डिव्हिजन, पुणे डिव्हीजनच्या अखत्यारीत ५० मुख्य रेल्वे स्थानकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतचा फोटो काढण्याची हौस फिटावी यासाठी मोठ्या रेल्वे स्थानकांवर ३ डी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत.

नरेंद्र मोदी यांचा ३ डी फोटो लावत त्यासोबत सेल्फी पॉंईट तयार करण्यात आला आहे. यातील काही रेल्वे स्थानकांवर हे ३ डी सेल्फी पॉंईट तात्पुरत्या स्वरूपात उभे करण्यात येणार आहेत. तर काही ३ डी सेल्फी पाँईट हे कायमस्वरूपी उभारण्यात येणार आहेत. मात्र नरेंद्र मोदी यांचा फोटो या सर्व रेल्वे स्थानकांवर उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यासाठी डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन विभागाकडून महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या ३ डी सेल्फी पाँइटच्या उभारणीसाठी १.२५ लाख रूपये आणि तर ज्या ठिकाणी कायमस्वरूपी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ६ लाख २५ हजार रूपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने माहिती अधिकारातंर्गत दिली आहे.

यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे जमा होणाऱ्या सर्वसामान्याच्या खिशातून जमा होणारे पैसे आणि करदात्या देशवासियांकडून भरण्यात येणाऱ्या करातून हा पैसा खर्च करण्यात येणार असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *