Breaking News

नरेंद्र मोदी दिवसातून पाचवेळा ड्रेस बदलतातः काँग्रेसने केला तो व्हिडीओ शेअर ओडिशातील अपघाताच्या दिवशी पाच वेळा ड्रेस बदलल्याचा केला आरोप

देशात संयुक्त पुरोगामी आघाडीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनीही तीन ते चार वेळा कपडे बदलल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठविली गेली. तसेच कपडे बदलामुळे त्यांना घरीही जावे लागले. मात्र या घटनेशी काहीस साधर्म्य घडणारी गोष्ट नुकतीच काँग्रेसकडून भाजपाचे सर्वेसर्वा तथा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतचा एक व्हिडिओ जारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचवेळा कपडे बदलतात असा आरोप केला आहे. तसेच यासंदर्भातील व्हिडिओ केरळ काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर शेअरही करण्यात आला आहे.

तसेच ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शेकडो प्रवासी जखमी झाले. यानंतर विरोधकांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

काँग्रेसने ट्वीट केलेल्या एका व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत ओडिशा रेल्वे अपघाताची माहिती घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विट करताना केरळ काँग्रेसने म्हटलं, सध्याच्या परिस्थितीकडे पाहिलं, तर आपल्याला असा पंतप्रधान मिळाला आहे जो दिवसातून पाचवेळा ड्रेस बदलतो.

या ट्विट मालिकेत काँग्रेसने इतिहासाची उजळणी करत नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देणाऱ्या काँग्रेस नेत्यांची माहिती दिली. काँग्रेसने म्हटलं, २००८ मध्ये मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी दिवसभरात तीनदा ड्रेस बदलला म्हणून त्यांच्यावर टीका झाली. यानंतर शिवराज पाटलांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

२०१३ मध्ये रेल्वेमंत्री पवन कुमार बंसल यांच्या पुतण्यावर रेल्वे बोर्डाच्या बढती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला. त्यानंतर पवन कुमार बंसल यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सीबीआयने केलेल्या तपासात या आरोपांमध्ये तथ्य सापडलं नाही, तरीही त्यांनी आपल्या पदाचा त्याग केला, असंही काँग्रेसने नमूद केलं.

या ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पदाचा राजीनामा देणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत असला तरी विरोधकांच्या टीकेला आतापर्यंत भीक न घालणाऱ्या मोदी यांच्याकडून अशी अपेक्षा करणे चुकच असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *