Breaking News

केंद्राकडून पी.व्ही.नरसिंहराव, एम.एस.स्वामीनाथन, चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न

संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणावर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यथेच्छ टीकास्त्र सोडल्यानंतर आणि देशाच्या आर्थिक दूरावस्थेला काँग्रेसला जबाबदार धरले. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव, हरित क्रांतीचे प्रणेते एम.एस.स्वामीनाथन आणि माजी जनता पक्षाच्या काळात उपपंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना देशाचा सर्वोच्च नागरी बहुमान भारतरत्न पुरस्कार आज जाहिर करण्यात आला.

यासंदर्भातील अधिकृत घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स या सोशल मायक्रो ब्लॉगिंग साईटवर ट्विट करत केली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न पुरस्कार जाहिर करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, भारतात आणिबाणी जाहिर केल्याच्या काळात त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणिबाणी विरोधी भूमिका मांडत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जीवन समर्पित केले. त्यांच्या शेतकऱ्यांच्या हिताबाबत स्विकारलेल्या भूमिकेबद्दल भारतरत्न पुरस्कार देत असल्याचे सांगितले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहिर केल्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना, पी.व्ही.नरसिंह राव यांचा उल्लेख गुरु असा करत जागतिक बाजारपेठेला भारताची कवाडे उघडी करून देत आर्थिक क्षेत्रात नवे पर्व सुरु केले. त्याचबरोबर नरसिंहराव यांनी परराष्ट्र नीती, भाषा आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीमुळे देशाला कठीण परिस्थितीतही चालण्याचे मार्गदर्शन मिळत आहे. तसेच त्यांच्या तत्ववादी आणि बुध्दीमान कर्तत्वामुळे देशातील सांस्कृतिक आणि पारंपारीक ज्ञानाचा वारसा ठरला असल्याचे मतही व्यक्त केले.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एम.एस.स्वामीनाथन यांनी आपल्या संशोधनाच्या कामातून देशाच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय कामामुळे देशाच्या कृषी आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाले.

विशेष म्हणजे कर्पुरी ठाकूर आणि रथयात्रेचे जनक लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहिर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव, हरितक्रांतीचे प्रणेते एम.एस.स्वामीनाथन आणि चौधरी चरण सिंग यांना आज भारतरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला. आणि याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यातच देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक पातळीवर सर्वसामान्य नागरिकांपासून ते वित्तीय संस्थांवर दिवाळखोरीची टांगती तलवार आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षातील आर्थिक आरिष्टास पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसला जबाबदार धरले आहे. याशिवाय देशातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सर्वच राज्यात निर्माण होत आहे. या सगळ्या घडामोंडीना बगल देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्काराची घोषणा तर केली नाही ना अशी सुप्त चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी आरक्षण फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *