Breaking News

प्रकाश आंबेडकर म्हणाले, …काँग्रेसच्या समावेशकतेवर प्रश्न

भाजपाला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य असून, याच हेतूने वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना ३९ कलमी किमान समान कार्यक्रम दिला आहे. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी लवकरच वंचित बहुजन आघाडीला एक तारीख सुचवेल अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली.

प्रकाश आंबेडकर पुढे ट्विटमध्ये म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांमध्ये सुरु असलेल्या वाढत्या संघर्षाच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. तरीसुद्धा माझी आणि वंचित बहुजन आघाडीची (VBA) भूमिका महाविकास आघाडीसाठी कायम आहे आणि राहील, असेही स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय लोक दल (RLD) आज इंडिया अलायन्समधून बाहेर पडल्याने, काँग्रेसच्या राजकीय समावेशकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र, महाविकास आघाडी इंडिया अलायन्सप्रमाणे संपुष्टात येणार नाही, अशी मला अजूनही आशा आहे. असेही मत व्यक्त केले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

पृथ्वीराज चव्हाण यांची टीका, पूर्णपणे विसरता येणारा अर्थसंकल्प…

देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केला. या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना राज्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *