Breaking News

उद्धव ठाकरे यांचा सवाल, ४०४ ची घोषणा करता मग नितीशकुमार सोबत कशाला

अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन नुकतेच झाले. मंदिरातील राम हा काही एकट्या मोदी आणि भाजपावाल्यांचा राम नाही. तर या भारतात राहणाऱ्या करोडो राम भक्तांचा राम आहे. जसा तो तुमचा आहे तसा तो माझाही आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाला आमंत्रण आले न आल्याची वाट पाह्यली नाही. पण मी नाशिकमधील काळाराम मंदिरातील रामाची पूजा केली, आरती म्हटल्याचे सांगत काळाराम मंदिराला एकवेगळा इतिहास आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन केले. त्याच व्यक्तीने लिहिलेल्या राज्यघटनेवर आज आपला देश चालत आहे. याच राम मंदिराच्या भरवश्यावर अबकी बार ४०४ चा नारा भाजपावाले देत आहेत तर मग यांना नितीश कुमार यांची सोबत कशासाठी असा सवाल शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपाला केला.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाने पक्ष बांधणीच्या उद्देशाने कोकणात दौरे सुरु केले. या दौऱ्याची सुरुवात कोकणातील पेण तालुक्यातून करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना वरील खोचक सवाल केला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात काही निर्बुध्द माणसे आहेत. त्यांना त्यांच्या नेत्यांची तुलना कोणाशी करावी याचेही भान राहिले नाही. त्यामुळे राम मंदिराच्या पुजेसाठी उपस्थित असलेल्या कोण्या गगणगिरी महाराजाने पंतप्रधानांची तुलना थेट छत्रपत्री शिवाजी महाराजांशी केली. मोदी तुमचे दैवत असतील पण त्यांची तुलना आमचे दैवत असलेल्या शिवाजी महाराज यांच्याशी का करता असा थेट सवाल करत शिवाजी महाराजांशी तुलना करणारे निर्बुध्द असल्याची टीकाही यावेळी केली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे शिवसेनेचे हिंदूत्व हे कडवट हिंदूत्व असून भले ही तो कोणत्या जातीचा, धर्माचा किंवा पंथाचा असेल पण या देशाचा भारतमातेचा आणि भारतीय राज्यघटनेचा आदर करत असेल तो आपला बाकिचे जे कोण देशात राहुन देशाच्या विरोधात काम करणारे आपले नाहीत. शिवसेनेचे हिंदूत्व हे राष्ट्रीयत्व असून असले हिंदूत्व तुमचे आहे का असा सवालही भाजपाला केला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसैनिकांचे सर्वाधिक आहे. हे सर्व देशाने पाहले. मात्र आता काहीजण त्याचे क्रेडिट घेण्यासाठी सातत्याने अयोध्येचे आणि महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. नुकतेच दोनदा पंतप्रधान मोदी हे दोनदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. आता पुन्हा एकदा ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. कशामुळे तर गद्दारांच्या घराणेशाहीसाठी येत आहेत असा उपरोधिक टोलाही लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आता निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीवर टीका केली. ज्या दिवशी नितीशकुमार इंडिया आघाडी सोडून भाजपाबरोबर गेले. त्याच्या दिवशी राजदचे नेते लालू प्रसाद यादव आणि राबरी देवी यांना ईडीच्या नोटीसा पाठविण्यात आल्या. तर दुसऱ्याबाजूला झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने ताब्यात घेतले. अरे असेल हिंमत तर तिकडे ठाण्यातील गद्दार घराणेशाही चालविणाऱ्यांवर, कोकणातील गद्दारांवर ईडीची धाड टाकून कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित करत जे यांच्या भाजपासोबत गेले त्यांच्यावर कारवाई करायची नाही आणि जे येत नाही त्यांच्यावर कारवाई करायची ही असे मोदी गँरटी असल्याची खोचक टीका करत आदी तुमच्या सोबत असलेल्या गद्दार घराणेशाहीतील लोकांना घरात बसवा मग घराणेशाहीवर टीका करा असे आव्हानही मोदी आणि भाजपाला दिले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता देशातील तीन कोटी युवतींना लखपती बनविणार असल्याची घोषणा आजच्या शेवटच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. पण यांना मणिपूरला जाऊन तेथील महिलांचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करता आला नाही. त्यांच्याच गुजरात राज्यातील बिल्कीस बानो यां भगिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची शिक्षा कमी करत मोकळे सोडले. इतके असून ही हे युवतींना लखपती बनविणार असा खोचक टीकाही मोदी यांच्यावर केली.

Check Also

शरद पवार यांनी सांगितला आर आर पाटील यांच्या राजकिय प्रवेशाचा किस्सा

देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. एक वेगळी विचारधारा देशात निर्माण झाली आहे. ज्यांना स्वातंत्र्य चळवळशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *