Breaking News

शरद पवार यांचा नरेंद्र मोदींना सवाल, आता गेट वे इंडियाला काय म्हणायचं? इंडिया-भारत वादावर आणि जी २० परिषदेवरुन साधला निशाणा

मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक संपन्न होत असतानाच केंद्रीतील मोदी सरकारने संसदेचं अधिवेशन बोलवलं. त्यातच जी २० या आंतरराष्ट्रीय नेत्यांची परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या निमित्ताने मोदी सरकारने अचानक इंडिया या शब्दाऐवजी भारत शब्द वापरण्याचा निर्णय घेतला. त्यामवरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच हसत हसत सवाल केल्याने शरद पवार यांच्या प्रश्नाला महत्व आले आहे.

शरद पवार म्हणाले, घटनेच्या पहिल्या वाक्यात भारत की इंडिया याबाबतची स्पष्टता आहे. जे इंडिया ऐवजी भारताची मागणी करत आहेत त्या मोदींना इंडिया नावाने किती योजना काढल्या विचारलं तर. त्यांनी इंडिया नाव असलेल्या अनेक योजना काढल्या. सकाळी मी घरून येताना एअर इंडियाच्या समोर एक दिशादर्शक बोर्ड होता. तिथं लिहिलं होतं गेट वे ऑफ इंडिया. आता गेट वे ऑफ इंडियाला काय म्हणायचं? असा हसत हसत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कारण नसताना महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित केले जाते. आहे आणि नाही त्या गोष्टीला महत्त्व दिलं जात आहे. हेच सध्याच्या राज्यकर्त्यांचं सूत्र आहे. त्यासाठीच हा भारत- इंडियाचा प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचेही स्पष्ट केले. .

दिल्लीत नुकतेच पार पडत असलेल्या जी २० या आंतरराष्ट्रीय परिषदेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, देशात २० देशांची मोठी परिषद सुरू आहे. अशा परिषदा देशात याआधी दोनदा झाल्या. एकदा पंतप्रधान इंदिरा गांधी असताना झाली आणि आणखी एकदा झाली होती. आता देशात तिसऱ्यांदा जी २० परिषद होत आहे. पहिल्या दोन परिषदांनाही जगातील लोक आले, मात्र त्यावेळी आजच्यासारखं वातावरण तयार करण्यात आलं नव्हतं. माझ्या कधी असं वाचनात आलं नाही की, त्या आधीच्या दोन परिषदांना चांदीची ताटं, सोन्याची ताटं आणखी काय काय होतं.

तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, जगातील विविध देशांचे प्रमुख या ठिकाणी येतात त्यांचा सन्मान करणं आपलं काम आहे हे मला मान्य. या देशाच्या दृष्टीने ती महत्त्वाची बाब आहे. मात्र, या निमित्ताने मुलभूत प्रश्नांऐवजी काही ठराविक लोकांच्या मोठेपणाचा प्रचार करण्यासाठी या परिषदेचा वापर होतोय. याची चर्चा आज ना उद्या होईल. तसेच लोक त्याविषयी आपली मतं बनवतील, असं भाकितही शरद पवार यांनी केले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचा आरोप, … शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची नरेंद्र मोदींची तयारी !

शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा (MSP) कायदा करावा या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *