Breaking News

रोहित पवारांचा खोचक टोला, पुण्यात असूनही अमित शाहंनी प्रचार करणं टाळलं यातच सगळं आलं कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघात काय निकाल लागणार बहुधा अचूक हेरलं असावे असा

पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून या दोन्ही जागा राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईसह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असूनही कसबा आणि चिंचवड येथील भाजपा-शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली नाही. विशेष म्हणजे काल दिवसभर अमित शाह हे काल पुण्यातच होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अमित शाह यांना खोचक टोला लगावत म्हणाले, कसबा पेठ, चिंचवड येथील मतदारसंघात काय निकाल लागणार हे अचूक हेरलं असावे? म्हणून त्यांनी प्रचार केला नाही असा टोला लगावला.

पुणे दौऱ्यावर येऊनही अमित शाह यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाचा प्रचार करणं टाळले. काल दिवसभर भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यानंतर संध्याकाळी एका प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमाला अमित शाह यांनी आवर्जून हजेरी लावली. तसेच या कार्यक्रमात बोलताना उध्दव ठाकरेंना धोकेबाज असल्याचा आरोप करत धोकेबाज लोकांना सोडायचं नसते असा इशाराही दिला. मात्र कसबा आणि पिंपरी चिंचवड येथील भाजपा उमेदवारांसाठी प्रचार करण्याचे टाळले. त्यावरून यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

रोहित पवार ट्वीटमध्ये म्हणाले, अत्यंत अचूक अंदाज बांधणारे, सूक्ष्म रणनीतिकार, निवडणूक नियोजनातले निष्णात व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शाह. पुण्यात येऊनही त्यांनी कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं आहे. कदाचित प्रदेश भाजपाविरोधातील असंतोष आणि संभाव्य ‘निकाल’ त्यांनीही हेरला असावा अशी उपरोधिक टीपण्णीही ट्विटद्वारे केली.

रोहित पवारांच्या ट्वीटनंतर अमित शाहांनी कसबा आणि चिंचवड मतदारसंघात प्रचार का टाळला? याबाबच राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. कसबा आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक २६ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहिर होणार आहे.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *