Breaking News

राम मंदीरांवरून खर्गे यांचा सवाल, अमित शाह कोण आहेत? पुजारी की महंत मंदीर उद्घाटनाची तारीख जाहीर करण्यावरून मल्लिकार्जून खर्गेंचा सवाल

त्रिपुरा येथील भाजपाच्या ‘जनविश्वास’ यात्रे दरम्यान बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्या येथे निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख १ जानेवारी २०२४ असल्याचे जाहीर केले. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी अमित शाहांवर टीकास्र सोडले असून राम मंदिराचे उद्घाटन करणारे तुम्ही कोण? असा सवाल केला.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा हरियाणातील पाणिपत येथे झालेल्या सभेत बोलताना खर्गे यांनी भाजपा सरकारवर टीकास्र सोडले. यावेळी त्यांनी अमित शाह यांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानाचाही समाचार घेतला.

यावेळी बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, अमित शाहांनी राम मंदिराचे उद्घाटन १ जानेवारी २०२४ रोजी होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, ही तारीख घोषित करणारे अमित शाह कोण आहेत? ते मंदिराचे पुजारी आहेत की महंत आहेत? या देशात प्रत्येकाची देवावर श्रद्धा आहे. मात्र, राम मंदिराची घोषणा अमित शाह का करत आहेत? हा अधिकार त्यांना कोणी दिला? असा सवाल करत अमित शाह हे राजकीय नेते असून पुजारी नाहीच. त्यांनी त्यांचं काम करावं आणि पुजारांना पुजाऱ्याचे काम करू द्यावे असा उपरोधिक टोलाही लगावला.

यावेळी बोलताना खर्गे म्हणाले, मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. मोदी सरकारने देशात दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, ते सुद्धा या सरकारने पूर्ण केलं नाही. मोदी सरकारने प्रत्येकाला १५ लाख रुपये देण्याचेही म्हटलं होतं. मात्र, त्याचं पुढं काय झालं माहिती नाही. त्यामुळे हे सरकार केवळ निवडणुकीच्या वेळी घोषणा करते. मोदी सरकार केवळ जुमला सरकार आहे, अशी टीकाही केली.

Check Also

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन वयाच्या ७२ व्या वर्षी कर्करोगामुळे घेतला शेवटचा श्वास

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी वयाच्या ७२ व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *