Breaking News

राहुल गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या वक्तव्याची कोणी खिल्ली उडवू नये काँग्रेसच्या मदतीला शिवसेना धावली

मुंबई : प्रतिनिधी

लोकशाहीत पंतप्रधान होण्याची भूमिका मांडण्याचा राहुल गांधींचा अधिकार आहे. त्याची कुणी खिल्ली उडवू नये असा इशारा भाजपला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी याच अधिकारातून पंतप्रधान झाले आहेत. खरंतर अडवाणी व्हायला हवे होते असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मदतीला धाव घेतली.

राहुल गांधी यांचा पराभव करा आणि त्यांना रोखा हा मार्ग आहे. त्यांच्या भूमिकेने अस्वस्थ होण्याचं काही कारण नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

काँग्रेस देशात आजही सर्वात मोठा पक्ष आहे. २०१४ ला विशिष्ट वातावरणामुळे त्यांचा पराभव झाला. राहुल गांधींच्या भूमिकेवर युपीएतील घटक पक्ष काय ते ठरवतील. आम्हाला शरद पवार लायक उमेदवार वाटतात. मोदी, जेटली, अडवाणी या प्रत्येकात क्षमता आहे. खुर्चीवर बसल्यावर सर्वांमध्ये क्षमता येत असल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या भूमिकेचे त्यांनी एकप्रकारे समर्थन केले.

शिवसेनेवर दबाव आणू शकत नाही

भाजपमध्ये गोंधळ आहे. आधी बसू मग बोलू. शिवसेनेच्या निर्णयावर कुणी दबाव आणू शकणार नसल्याचे जाहीर करत स्वबळावर निवडणूक लढवणे ही उद्धव ठाकरे यांची भूमिका असून ती स्पष्ट असल्याचा पुर्नरूच्चारही त्यांनी यावेळी केला.

पालघर प्रमाणे गोंदिया-भंडारा निवडणूक लढवावी अशी पक्षात भावना आहे. दुर्दैवी निर्णय भाजपचा. शिवसेनेला ताकद आणि स्वाभिमान दाखवण्याची ही संधी आहे. मुख्यमंत्र्याना सहकार्याची अपेक्षा असेल तर त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घ्यावा. पालघरची जागा भाजपची असती तर त्यांना काँग्रेसचा उमेदवार भाड्यानं घेण्याची वेळ आली नसती अशी बोचरी टीका करत ज्यांनी वणगांविरुद्ध निवडणूक लढवली त्यांना तुम्हाला उमेदवारी का द्यावी लागली हा जनतेच्या मनातला सवाल असल्याचेही त्यांनी सांगितले.

भुजबळांची अशी वाताहत झाली नसती

भुजबळ राजकीय विरोधक पण व्यक्तिगत दुष्मनी नाही. बाळासाहेबांची साथ ज्यांनी सोडले त्या प्रत्येकाची वाताहत झाली. मनी लोन्ड्रीगचे आरोप असलेला पी चिदम्बरम यांचा मुलगा कार्ति आठ दिवसात जामीनावर तुरुंगाबाहेर येतो मग भुजबळ यांना अडीच वर्षे का लागली ? भुजबळ आज शिवसेनेत असते तर त्यांच्यावर ही वेळ ओढावली नसती अशी प्रतिक्रिया व्यक्त करत भुजबळ यांनी आता आपल्या प्रकृतिची काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *