Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, …तर शिवसैनिकांच्या मागणीमुळे द्रोपदी मुर्मना पाठिंबा माझ्यावर कोणाचाही दबाव नाही

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळी नंतर मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदारही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरु होती. त्यातच काल रविवारी झालेल्या पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी खासदारांच्या बोलाविलेल्या बैठकीतही अनेक खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या भाजपाच्या उमेदवार द्रोपद्री मुर्म यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे अधिकृत काय भूमिका जाहिर करणार याकडे उत्सुकत्ता लागून राहिली. मात्र आज संध्याकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून पक्षाची भूमिका जाहिर केली.

शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे म्हणाले की, गेल्या ४-५ दिवसांत आदिवासी आणि त्या समाजात काम करणाऱ्या शिवसैनिकांनी विनंती केली आहे. त्यात एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे, अमशा पडवी, निर्मला गावित, पालघरच्या जि.प. अध्यक्षा आल्या होत्या. एसटी-एससी समाजातल्या लोकांनी विनंती केली आहे की पहिल्यांदा आदिवासी समाजातल्या व्यक्तीला राष्ट्रप्रमुख बनण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला त्याचा आनंद होईल. या सगळ्यांचा मान ठेवून शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे जाहिर केले.

शिवसेना खासदारांच्या बैठकीबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या असून त्यावर देखील उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक समोर आली आहे. मी मुद्दाम स्वत: तुमच्यासमोर बसलोय कारण काही बातम्या विचित्रपणे तुमच्यापर्यंत आल्या आहेत. एक स्पष्टपणे सांगतो की काल खासदारांच्या बैठकीत कुणीही माझ्यावर दबाव आणलेला नाही. सगळ्यांनी निर्णय माझ्यावर सोपवला आहे. आजही मातोश्रीवर रीघ लागली आहे. त्यात मी गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली आहे. खासदारांसोबतही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

हा पाठिंबा देण्यामागे कुणाचाही दबाव नाही हे मी पुन्हा सांगतोय. खरंतर सध्याच्या राजकीय परिस्थितीत मी विरोध करायला हवा होता. पण शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी कधीच कोत्या मनाने विचार केलेला नाही. प्रतिभाताईंना देखील शिवसेनाप्रमुखांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जींनाही पाठिंबा दिला होता. त्यालाच अनुसरून मी लोकांनी केलेल्या आग्रहाचा आदर करून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर करतोय असे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *