Breaking News

देशाची नवी संसद म्हणजे सोमालियाच्या जून्या संसदेची डिझाईनः काँग्रेस आणि तृणमुलचा आरोप २३० कोटी रूपयांना कॉपीकॅट

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला देशाच्या प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती धनकड यांना पूर्णतः बाजूला सारल्यावरून देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठविली. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा एक नवा इतिहास (?) ही भाजपाकडून पुढे करण्यात आला त्यावरही काँग्रेससह अनेकांनी टीकेची झोड उठविली. तरीही नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वःहस्ते केले. विशेष म्हणजे या सोहळ्यावर अनेक विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता. दरम्यान, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि तृणमुल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी संसदेच्या नवीन इमारतीचं डिझाईन आफ्रिकेतील देश सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी असल्याचा आरोप मोदी सरकारवर केला आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांचं ट्वीट रिट्वीट करत काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी लिहिलं आहे, तुम्हालाही असं वाटतं का, सोमालियाने नाकारलेली हे संसद भवन आपल्या पंतप्रधानांसाठी प्रेरणा आहे.
दिग्विजय सिंह यांनी लिहिलं आहे, जवाहर सरकार यांना पैकीच्या पैकी गुण. तुम्हालाही असं वाटतं का, सोमालियाने नाकारलेली हे संसद भवन आपल्या पंतप्रधानांसाठी प्रेरणा आहे. कॉपीकॅट आर्किटेक्टकडून २३० कोटी रुपये वसूल करायला हवेत, अशी मागणी सिंह यांनी केली.

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी सोमवारी २९ मे रोजी ट्वीट केलं की गुजरातमधील मोदींच्या पाळीव आर्किटेक्टने सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी करण्यासाठी २३० कोटी रुपये आकारले आहेत. सोमालियाने त्यांची जुनी संसद नाकारली आहे. सोमालियाने नाकारलेली संसद नव्या भारताची प्रेरणा आहे. गुजरातमधील मोदींचे पाळीव वास्तुविशारद जे नेहमी बोली लावून मोदींकडून मेगा कॉन्ट्रॅक्ट (अहमदाबाद, वाराणसी, दिल्लीची संसद + सेंट्रल व्हिस्टा) मिळवतात, त्यांनी आपल्याकडून सोमालियाच्या डिझाइनची कॉपी करण्यासाठी २३० कोटी रुपये आकारल्याचा दावा केला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

राज्यातील काँग्रेसची पडझड रोखण्यासाठी २८८ विधानसभा मतदारसंघात २५२ निरिक्षक

आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना फोडण्याचे काम सध्या भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *