Breaking News

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींचा अवमान? काँग्रेसची टीका

मागील १० वर्षात केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून पंतप्रधान म्हणून असलेला एक राजशिष्टाचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच पाळला नसल्याची चर्चा आतापर्यंत सर्वाधिक काळ राहिली आहे. देशात नव्या संसद भवन इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर देशाच्या घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना कार्यक्रमाला पाचारण केले नाही. तत्पूर्वी कर्तव्यपथ या राजपथाच्या रस्त्याचे नामकरण करण्याच्या कार्यक्रमालाही राष्ट्रपतींना बोलावले नाही. वास्तविक पाहता या दोन्ही कार्यक्रमांना राष्ट्रपतींना बोलावणे आवश्यक होते.

काही महिन्यांपूर्वी देशातील लोकसभा निवडणूकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग पाच जणांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराची घोषणा केली. विशेष म्हणजे निवडणूकीची आचारसंहिता देशभरात लागू करण्यात आलेली आहे. या कालावधीत देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपती पदावरील व्यक्तींनी शक्यता राजकिय हेतू असलेल्या आणि धार्मिक कार्यक्रमांना जाहिरपणे हजेरी लावू नये असे संकेत आतापर्यंत राजकिय वर्तुळातून सांगण्यात येतात. तसेच कोणताही पुरस्काराचे वितरण करण्यासाठी राष्ट्रपतींनी आपल्या भवनात किंवा दालनात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करावा असे सांगण्यात येते. त्याचबरोबर एखादा महनीय व्यक्ती जर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहु शकला नाही तर संबधित व्यक्तीच्या घरी तितकाच तुल्यबळ पदावरील व्यक्ती पाठवून संबधित व्यक्तीचा सन्मान केला जातो. नव्हे तसे संकेत अद्याप तरी पाळले जात होते.

परंतु नुकत्याच राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या भारतरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याला राम मंदीर कारसेवा यात्रेचे जनक लालकृष्ण अडवाणी हे त्यांच्या प्रकृती स्वास्थामुळे उपस्थित राहु शकले नाहीत. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनाच्या बाहेर जात गुजरातमधील लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही उपस्थित होते.

विशेष म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर काढलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत खुर्चीवर बसून आहेत. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या उभ्या आहेत असे फोटो केंद्र सरकारकडून प्रसारीत करण्यात आले.

या फोटोवरून काँग्रेसने भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत एक्स या ट्विटर अकाऊंटवरून टीका केली. काँग्रेसने आपल्या टीकेत म्हटले की, देशाच्या महामहिम राष्ट्रपती या उभ्या आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बसलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोदींनी आदिवासी महिला राष्ट्रपतींचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. ही काही पहिलीच वेळ नाही. नवीन संसदेचे उद्घाटन झाले तेव्हाही राष्ट्रपतींना निमंत्रित करण्यात आले नव्हते. राम मंदिराच्या कार्यक्रमालाही निमंत्रण देण्यात आले नव्हते. यावरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानसिकता दलित आणि महिला विरोधी असल्याचे दिसून येत आहे.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *