Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मोदी हे करणार असतील तर देशाची…

मोदी तुमच्या श्रीमंत मित्रांना अजून श्रीमंत करणं, मातृभूमीच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे का? असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, खाजगी कंपन्यांची कार्यालये आणि गुंतवणुकी विविध देशात असतात. सुरक्षा संशोधन आणि DRDO ची दारं खाजगी कंपन्यांसाठी खुली करणं म्हणजे, देशाची सुरक्षा विकण्यासारखे असल्याचा आरोपही केला.

प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका करताना म्हणाले, मोदी हे करणार असतील तर देशाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही असा धीरगंभीर आरोप करत सरकारचे माजी प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजय राघवन यांच्या अध्यक्षतेखाली भविष्यातील युद्धासाठी आत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने DRDO मध्ये सुधारणा करण्यासाठी उच्चाधिकार समितीने आपला अहवाल सादर केला आहे. यानुसार DRDO मध्ये खाजगी कंपन्यांचे सहाय्य घेण्याची तरतूद केली असल्याची सूत्रांनी सांगितले आहे. मात्र अद्याप सरकारने या अहवालाबाबत गुप्तता पाळली असल्याचा आरोपही केला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, जयंत पाटील कोणाच्या संपर्कात माहित नाही

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *