Breaking News

राजकारण

सर्व जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारणार ॲड. यशोमती ठाकूर यांनी घेतला आढावा

मुंबई : प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून राज्यातील सर्व जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्याचे प्रस्तावित असून सर्व प्रशासकीय पूर्तता करुन लवकरात लवकर शासन निर्णय निर्गमित करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. महिला व बालविकास विभागाच्या सर्व जिल्हा कार्यालयांना स्वतंत्र इमारत उपलब्ध …

Read More »

रेशनिंग व्यवस्थेबद्दल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे मंत्री भुजबळांना पत्र; केल्या या मागण्या पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याबरोबरच एसएमएस सेवा पुन्हा सुरु करा

मुंबई : प्रतिनिधी   प्रति, ना.श्री.छगन भुजबळ साहेब अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र शासन.   विषय: रेशनिंग व्यवस्थेतील धान्य, शिधावस्तुंची गळती, भ्रष्टाचार, कार्डधारकांची फसवणूक, नियमांविषयी, अधिकारांविषयी लोकांमध्ये असणारे अज्ञान, संदिग्धता यांसारख्या त्रुटी दूर करण्यासाठी तसेच पारदर्शक व्यवस्थेसाठी खालील मागण्या करत आहोत.   मा.महोदय, रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ नुसार स्थानिक पातळीवर …

Read More »

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का? ड्रग कनेक्शन चौकशीत एनसीबीची कंगणावर मेहरबानी का? काँग्रेसचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी सुशांतसिंह प्रकरणातून बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबीने काही लोकांना अटक केली. आता बॉलिवूडमधील काही कलाकारांची चौकशी होत असताना या प्रकरणाशी संबंधीत असलेल्या भारतीय जनता पार्टी-बॉलिवूड-सँडलवूड-गोवा ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी का करत नाही, हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB ) आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी येत्या १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साजरे होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा सण हा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गणपती उत्सवादरम्यान ज्या प्रकारे सहकार्य केले त्याच प्रकारे या सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावे, जेणेकरुन कोरोनाचा प्रसार थांबविता …

Read More »

पंतप्रधान म्हणाले “महाराष्ट्र के लोग बहादूर”, तर मुख्यमंत्री म्हणाले ” लढ्याचा परिणाम दिसेल” पंतप्रधानांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास

मुंबई: प्रतिनिधी माझे कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला आपल्याला दिसेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार …

Read More »

शेतकऱ्यांचे आंदोलन आणि दिपीका पदूकोनेची चौकशी २५ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे एनसीबीचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या चौकशी संस्थांचा वापर सोयीने करण्यात येत असल्याचा आरोप केंद्रातील भाजपा सरकारवर करण्यात येत आहे. मात्र या गोष्टीला दुजोरा देणारी घटना नुकतीच घडली असून रिया चक्रवर्ती प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री दिपीका पदूकोनेला एनसीबीने केंद्र सरकारला सोयीची ठरेल अशा तारखेला चौकशीसाठी बोलाविले आहे. नुकतेच संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या …

Read More »

कलानगरचे पाणी ओसरले मुंबईतील का ओसरत नाही? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील पाऊस ओसरला तरी पाण्याचा निचरा होत नव्हता याबाबत चिंता व्यक्त करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी कलानगरचे पाणी ओसरले मुंबईतील अन्य ठिकाणचे का पाणी ओसरत नाही? असा सवाल उपस्थित केला. याबाबत बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर …

Read More »

मुंबई पोलिसांचा अपमान करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंना भाजपकडून बक्षीस? महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा हीन डाव उघड !: सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी अभिनेता सुशांतसिंग प्रकरणाचा वापर करुन महाराष्ट्राला बदनाम करत राष्ट्रीय महत्व कमी करण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. या कटाचा एक भाग असलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला असून तो तात्काळ मंजूरही करण्यात आला आहे. या पांडेंना लवकरच भाजपाकडून मोठे बक्षीस मिळू शकेल यात शंका …

Read More »

शरद पवारांनी या रूग्णांसाठी तात्काळ दिली १ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स आरोग्य मंत्री राजेश टोपेंची घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तात्काळ १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. सर्वप्रथम गरजू आणि गरीब …

Read More »

मराठा समाजातील असंतोष दूर करण्यासाठी राज्य सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय साडेतीन तासाच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व विधीज्ञ यांच्यासोबत केलेल्या चर्चेनुसार राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरीम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे …

Read More »