Breaking News

राजकारण

कंगनाच्या वक्तव्यापासून भाजपाचे एक पाऊल मागे राम कदमांच्या चुकीची सारवासारव करण्यासाठी भाजपा नेते आशीष शेलार पुढे

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानावत हीने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप करत मुंबई म्हणजे पाकव्याप्त कश्मीर झाल्याचे  वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याला राजकिय पाठबळ देण्यासाठी भाजपाचे आमदार राम कदम यांनी पुढाकार घेत तीचे वक्तव्य स्वत:च्या ट्विटवर रिट्विट करत समर्थन देण्याचा प्रयत्न केला. परंतु सोशल …

Read More »

८ दशकानंतर महसूल रचनेत बदल : ७/१२ वर आता या गोष्टी नव्याने दिसणार युनिक कोड, वॉटर मार्क, लोगो आणि क्यूआर कोड असणार सातबाराचे वैशिष्ट्य - महसूलमंत्री थोरात

मुंबई: प्रतिनिधी जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण १२ प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.  प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत महाराष्ट्रातील …

Read More »

कंगना टीम म्हणजे कंगना +भाजप आय टी सेल देवेंद्र फडणवीस आणि भाजपने महाराष्ट्राची विनाशर्त माफी मागावी- काँग्रेसची मागणी

मुंबई : प्रतिनिधी कंगना टीम म्हणजे “कंगना + भाजप आय टी सेल” असून कंगनाच्या ट्वीट आणि वक्तव्यांमागे भारतीय जनता पक्ष आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने भाजपचे आमदार राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा आणि आमची मुंबईवरती प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे. याबद्दल कंगना रानावतचे …

Read More »

दोन सेवा निवृत्त अधिकाऱ्यांना आयएएस पदी बढती या दोघांची सेवा नियमित करणार का? कर्मचाऱ्यांचा सरकारला सवाल

मुंबई : प्रतिनिधी सेवाज्येष्ठतेनुसार महसूल केडरमधील अधिकाऱ्यांना आयएएस पदी बढती देताना राज्य सरकारने दोन सेवानिवृत्त झालेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांना आयएएस पदी बढती दिल्याची माहिती पुढे आली असून आता या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यातील महसूल आणि मंत्रालय केडरमधील २३ अधिकाऱ्यांना  २०१८ च्या सेवाज्येष्ठतेनुसार आयएएस …

Read More »

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनो या तारखेपासून परिक्षेची प्रक्रिया सुरु होणार राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची राजभवन येथे बैठक संपन्न

मुंबई : प्रतिनिधी अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची राजभवन येथे ऑनलाईन माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत १५ सप्टेंबरपासून परिक्षेची प्रक्रिया सुरु करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा …

Read More »

निखिल गुप्ता औरंगाबादचे नवे पोलिस आयुक्त ४० हून अधिक बदल्यानंतर आज आणखी ४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध अशा ४० हून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आज पुन्हा ४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिंरजीव प्रसाद यांची बदली नागपूर परिक्षेत्राच्या विशेष महानिरिक्षक पदी करण्यात आली असून त्यांच्या ठिकाणी केंद्रातून प्रतिनियुक्तीवरून परतलेले निखिल गुप्ता यांना औरंगाबादच्या पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात …

Read More »

राज्याच्या क्रीडा धोरणात लवकरच सुधारणा; या वर्गातील खेळाडूंना शासकिय नोकरी शासकीय सेवेत थेट संधी मिळालेल्या खेळाडूंचा उपयोग नवीन खेळाडू घडवण्यासाठी व क्रीडाविकासाठी करणार

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय पदकविजेत्या राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा, शासकीय सेवेत आल्यानंतर खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रीत करता यावं, या खेळाडूंच्या गुणवत्तेचा उपयोग नवीन खेळाडूंना मार्गदर्शन, दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी, राज्याच्या क्रीडाविकासासाठी व्हावा, यादृष्टीने सध्याच्या क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

मंदिर सुरु करण्याबाबत विनंत्या करण्यात येतायत… वाचा मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले याप्रश्नी पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूरचा आढावा घेताना सूचक वक्तव्य

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मंदिर सुरु करण्याबाबत अनेक राजकिय पक्ष, संघटनांच्यावतीने विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावी लागणार असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत आणखी काही दिवस तरी राज्यातील मंदिरे उघडली जाणार नसल्याचे सुतोवाच केला. पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनावरील उपाययोजनांचा आढावा घेताना त्यांनी वरील सूचक …

Read More »

राज्यात गणेशोत्सवाचेच नियम नवरात्र उत्सवाला का? भाजपा नेते आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्सवापूर्वी मुर्तीकारांना शासन निर्णयाची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. आता नवरात्रोत्सवाची तयारी झाली असल्याने देवीच्या मुर्ती तयार होण्यापूर्वी शासन निर्णय जाहीर केल्यास त्यांचे संभावित आर्थिक नुकसा होणार नाही. त्यामुळे नवरात्र उत्सवालाही गणेशोत्सवाचे नियम लागू आहेत का? असा सवाल करत यासंदर्भात बैठक घेवून …

Read More »

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा…अन्यथा आदेश झुगारून मंदिर प्रवेश मंदिरावर अवलंबून असलेली छोट्या अर्थव्यवस्थेचा तरी विचार करण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी राज्यात अनेक मंदिर आहेत. मात्र या मंदिरावर फक्त पुजाऱ्यांची उपजिविका अवलंबून नाही तर मंदिरावर अवलंबून असलेले गुरव आणि त्याच्याशी निगडीत असलेली तेथील गावाची किंवा छोट्या व्यापाऱ्यांची अर्थ व्यवस्था अवलंबून आहे. त्याचबरोबर अनलॉकच्या नावाखाली जनजीवन सुरळित करण्याचे प्रयत्न सुरु असताना सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे असा सवाल …

Read More »