Breaking News

राजकारण

अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबरः दोन हजार रुपयांची दिवाळी भाऊबीजेची भेट महिला व बाल कल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि …

Read More »

अन्वय नाईक कुटुंबिय आणि रश्मी उद्धव ठाकरे यांच्यातील जमीनींच्या खरेदी व्यवहाराची चौकशी करा भाजपा नेते डॉ. सोमैय्या यांची रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या केलेले अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात संयुक्तरित्या जमिनीचे व्यवहार केले असल्याबाबतची कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. हे व्यवहार प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत असल्यामुळे त्याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते …

Read More »

भाजपा सरकारमध्ये मंत्री असताना उद्विग्न होवून राजीनामा दिला होता भाजपाचे माजी मंत्री बडोलेंचा अप्रत्यक्ष फडणवीसांवर निशाणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यी आणि समाजाच्या विकासाच्यादृष्टी कोनातून अनेक योजना, महामंडळांची निर्मिती करण्याचे निश्चित केले. मात्र त्यावेळी सरकारच्या प्रमुखाकडे मागासवर्गीय बेरोजगार तरूणांच्या उद्योगासाठी निधी मिळावा यासाठी खुप झगडलो. शेवटी राजीनामा दिला. परंतु त्यावेळच्या सरकारच्या प्रमुखाने कोणतीही मदत न दिल्याने सगळ्या गोष्टी कागदावरच राहील्याची खंत माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले …

Read More »

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून या दोघांना उमेदवारी आणखी दोन जागांवरील उमेदवार नंतर जाहीर होण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवार निश्चित केले आहेत.नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजित गोविंदराव वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातून जयंत दिनकर असगावकर यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक …

Read More »

या ११ प्रमोटी आयएएस अधिकाऱ्यांना दिल्या अखेर महिनाभरानंतर नियुक्त्या महसूल, मंत्रालय आणि सहकार विभागातून पदोन्नती मिळालेले अधिकारी

मुंबई: प्रतिनिधी साधारणत: महिनाभरापूर्वी राज्यातील २० हून अधिक अतिरिक्त जिल्हाधिकारी पदासह समकक्ष असलेल्या मंत्रालय आणि सहकार विभागातील अधिकाऱ्यांना आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती. मात्र त्यांना नियुक्ती प्रदान करण्यात आली नव्हती त्यापैकी ११ प्रमोटी आयएएस अधिकाऱ्यांना आज नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यापैकी थेट आयएएस अधिकारी वल्सा नायर सिंह यांची सामान्य …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांचे सर्व थकीत वेतन दिवाळीपूर्वी शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर-परिवहन मंत्री ॲड. परब

मुंबई : प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज …

Read More »

कोरोनामुळे नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईत विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी विधिमंडळाच्या प्रथेप्रमाणे वर्षभरातील किमान एक अधिवेशन नागपूरात घेतले जाते. त्यानुसार नियोजित हिवाळी अधिवेशन नागपूरात घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाय येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने नियोजित नागपूरचे अधिवेशन यंदा मुंबईत घेण्याचा निर्णय आज झालेल्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. …

Read More »

राज्यपालांनी अर्णवपेक्षा न्यायासाठी भटकणाऱ्या नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी एका गंभीर गुन्ह्याखाली अटक झालेल्या आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं असे सांगतानाच एका आरोपीची बाजु घेणे योग्य नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. राज्यपाल यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या …

Read More »

अर्णबसाठी राज्यपाल कोश्यारींचा गृहमंत्र्यांना फोन गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत व्यक्त केली चिंता

मुंबईः प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा केली व रिपब्लिक मिडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांचेशी बोलण्याची अनुमती द्यावी अशीही सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली. राज्यपालांनी यापूर्वी गृहमंत्री …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे लगेच तर उर्वरित वेतन लवकरच परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आज काही रक्कम जमा करण्यात आली असून सध्या एक महिन्याचे वेतन साधारणतः एका तासाभरात त्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार आहे. तर उर्वरित थकित पगारीसाठी बँकेकडे आणि इतर वित्तीय संस्थांकडे कर्ज घेण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरु असल्याची माहिती परिवहन मंत्री …

Read More »