Breaking News

राजकारण

या चार सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या ओ.पी. गुप्ता नवे उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सचिव

मुंबई : प्रतिनिधी दिवाळी झाल्यानंतर लगेच राज्य सरकारने चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या रिक्त प्रधान सचिव पदी ओ.पी.गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यांच्यासह आणखी चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अरविंद कुमार यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित …

Read More »

खुशखबर: अनुसूचित जमातीमधील या विद्यार्थ्यांना मिळणार २६ हजाराचे आर्थिक सहाय्य मंत्री अॅड. के.सी. पाडवी यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत  परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात …

Read More »

खोटं बोलणार्‍या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार भाजपा आ. अतुल भातखळकर यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळातील वाढीव व चुकीच्या वीज बिलांमध्ये सवलत देणार नाही असं सांगून खोटं बोलणार्‍या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी इशारा दिला. भाजपाने अन्यायी वीज बिलांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर वीज बिलात सवलत देऊ असे सरकारने जाहीर केले, तसा प्रस्ताव …

Read More »

वाढीव वीज बिलाबाबत ऊर्जामंत्र्यांची घोषणा आणि दोन पक्षातील राजकारण सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा नाहीच

मुंबई : प्रतिनिधी लॉकडाऊन काळातील मार्च ते जून अखेर पर्यंत या चार महिन्याच्या कालावधीत आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देता येणार नसल्याची स्पष्ट कबुली ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. कोरोना लॉकडाऊनमधून सूट देण्यास सुरुवात केल्यानंतर वीज वितरण महामंडळाने सुरुवातीला चार महिन्याच्या एकूण मीटरचे रिडिंग घेवून सर्वच …

Read More »

रोहिणी खडसे-खेवलकर कोरोना पॉझिटीव्ह रूग्णालयात दाखल झाल्याची ट्विटरवरून माहिती

मुक्ताईनगर-मुंबई : प्रतिनिधी भाजपामध्ये होत असलेल्या घुसमटी आणि अन्यायामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वडील एकनाथ खडसे यांच्यासोबत प्रवेश केलेल्या रोहिणी खडसे-खेवलकर या कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवरून दिली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून आपण रूग्णालयात दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आपली तब्येत उत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Share on: WhatsApp

Read More »

धार्मिकस्थळे उघडण्याच्या निर्णयास भाजपाची आंदोलने आणि भक्तांची श्रध्दा कारणीभूत सरकारची परवानगी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने अखेरीस राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्याची परवानगी दिली असली तरी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगितले. मंदिरांमध्ये दर्शन घेताना भाविकांनी कोरोनाविषयी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनःश्च …

Read More »

दिवाळीनिमित्त शरद पवारांचे आईला खुले पत्र, वाचा त्यांच्याच शब्दात भावनिक नात्यांबरोबर जून्या आठवणींना उजाळा

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडीचे कर्त्येधर्त्ये तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्वर्गीय आईला खुले पत्र लिहित आपल्या गतकालीन आठवणींना उजाळा देत आईबरोबरील भावनिक नात्यांबद्दलचे मनोगत पत्राद्वारे व्यक्त केले. त्यांच्या राजकिय जीवनात एकएक पदे वर जाताना आईच्या शिकवणूकीची आठवण आणि त्यांची सतत होणारी उणीव याबदलच्या भावनांना पहिल्यांदाच पवारांनी …

Read More »

अखेर भक्तांसाठी ‘श्रींची इच्छा! मंदिरे, प्रार्थनास्थळे या दिवसापासून उघडणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली घोषणा

मुंबई : प्रतिनिधी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा …

Read More »

मंत्री नवाब मलिक यांनी वक्फच्या जमीनी, मालमत्तांबाबत घेतला मोठा निर्णय मुंबईतील एका वक्फ मालमत्तेच्या भाड्यात अडीच हजारावरुन २.५५ लाख रुपयांपर्यंत वाढ

मुंबई : प्रतिनिधी वक्फ बोर्डाच्या जमीनी किंवा मालमत्ता ह्या खाजगी किंवा सार्वजनिक आस्थापनांना कवडीमोल दराने भाड्याने देण्याच्या प्रकारास आळा घालण्याच्या दृष्टीने राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने महत्वाची पाऊले उचलली आहेत. मुंबईतील एका मालमत्तेचा सुधारित भाडेकरार करताना मासिक भाडेरक्कम ही अवघ्या २ हजार ५०० रुपयांवरुन वाढवून ती मासिक २ लाख ५५ हजार …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसने या दोघांना दिली उमेदवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून अरुण लाड यांच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार कधी जाहीर करणार याची उत्सुकता लागली असतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण आणि अरुण लाड …

Read More »