Breaking News

राजकारण

भुजबळ आणि त्याचा पुतण्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्त एसीबी न्यायालयाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील राज्य सरकारच्या मालकीच्या आरटीओच्या जमिनींवरील बांधकाम आणि नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामाचा ठेका देताना मोठ्या प्रमाणावर छगन भुजबळ यांना लाच मिळाल्याच्या आरोपातून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर बुजबळ यांची आज एसीबीच्या न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. तसेच याप्रकरणात सबळ …

Read More »

देशाच्या संपत्तीचे मालक नागरिक: लुटणाऱ्यांविरोधात काँग्रेस करणार संघर्ष केंद्रातील जुलमी, अत्याचारी भाजपा सरकारविरोधात पेटून उठा!: नाना पटोले

सातारा-मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भाजपा सरकार आपली राष्ट्रीय संपत्ती दोन चार उद्योगपती मित्रांच्या घशात घालत आहे. देशातील रस्ते, रेल्वे स्टेशन, रेल्वेमार्ग, ऊर्जा विभाग, गॅस पाईपलाईन, टेलिकॉम सेक्टर, गोडावून, खाणी, विमानतळे, बंदरे अशी पायाभूत क्षेत्रे उद्योगपतींना ६ लाख कोटी रुपयांसाठी ४० वर्ष लीजवर दिली आहेत. देशाची संपत्ती खाजगी लोकांना विकण्याचा सपाटाच लावला …

Read More »

कोणतीही व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये मात्र पंचनाम्यांची शहानिशा करा आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई: प्रतिनिधी राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे शेती पिकांसोबतच इतर बाबींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, हे लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने काटेकोरपणे पंचनामे करावेत, कोणताही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना देतानाच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार …

Read More »

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे प्रमुख निर्णय महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

मुंबईः प्रतिनिधी महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. तसेच महानिर्मितीकडून भाग भांडवल उपलब्ध करून देण्यासही मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. १८७ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी तसेच ३९० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी दोन स्वतंत्र प्रस्तांवाना मंत्रिमंडळाने मान्यता दिली. १८७ मेगावॅट …

Read More »

डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का ? शिवसेनेच देऊळ बंदीच अभियान-आशिष शेलार

मुंबईः प्रतिनिधी काल एका कार्यक्रमात मुख्यमंत्री राज्याला संबोधून म्हणाले की राज्याला मंदिरांची गरज आहे की आरोग्य मंदिरांची गरज आहे ? आरोग्य केंद्र बंद करु आणि मंदिर उघडू का ? मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता का दाखवतायत हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, …

Read More »

NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीरसिंग आरोपी का नाही ? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात खोटे पुरावे तयार करण्यासाठी परमबीर सिंग यांनी ५ लाख रूपयांची लाच देवू केल्याचा आरोप एका सायबर एक्सपर्टने केल्याने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे आणखी अडचणीत येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक …

Read More »

शरद पवारांनी बोलाविलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत या मुद्यांवर झाली चर्चा विद्यमान आमदारांमध्ये कामे होत नसल्यावरून नाराजी

मुंबईः प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या असल्या तरी त्या निवडणूका फार काळ लांबविता येणार नाही. त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जर तातडीने निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करावा लागला तर ओबीसीच्या जागेवर ओबीसीचाच उमेदवार देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती या बैठकीस उपस्थित …

Read More »

सहकारातील स्वाहाकार संपण्याच्या भीतीपोटीच पवारांचा या गोष्टीला विरोध माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी बँकांमधील ठेवी सुरक्षित राहाव्यात यासाठीच रिझर्व्ह बँकेने सहकारी बँका व नागरी बँकांवर नियंत्रणे आणल्याची ग्वाही अर्थमंत्र्यांनी लोकसभेत दिली असतानाही, सहकारातील स्वाहाकार संपण्याच्या भीतीने नियंत्रणास विरोध करण्याचा शरद पवार यांचा कांगावा आता फोल ठरणार आहे, अशा शब्दांत राज्याचे माजी कृषीमंत्री व भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी पवार यांच्या …

Read More »

माथाडी मंडळांच्या भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी असंघटित कामगार असलेल्या विविध माथाडी मंडळांमध्ये रिक्त पदे मोठ्या प्रमाणात असून ही पदे भरण्यासाठी आवश्यक आकृतीबंध, सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आले आहेत. याबाबतची भरतीप्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही करतानाच या भरतीमध्ये माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्याचे निर्देश कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीची ८३ वी बैठक मंत्रालयात कामगार …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपा असा साजरा करणार भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा एकाच वेळी एक लाख कार्यकर्त्यांशी संवाद

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी असून या दिवशी भाजपाच्या प्रत्येक बुथ मधील केंद्र सरकारच्या योजनेच्या २१ लाभार्थांचा सत्कार करून साजरा करण्यात येणार असून मोदींचा वाढदिवस ते दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या कालावधीत बुथ ते राज्यस्तरावरील एक लाख कार्यकर्त्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती भाजपा …

Read More »