Breaking News

NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीरसिंग आरोपी का नाही ? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात खोटे पुरावे तयार करण्यासाठी परमबीर सिंग यांनी ५ लाख रूपयांची लाच देवू केल्याचा आरोप एका सायबर एक्सपर्टने केल्याने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे आणखी अडचणीत येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक नवाब मलिक यांनी या संपूर्ण प्रकरणात माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे नाव का नाही असा थेट सवाल एनआयएच्या तपास यंत्रणेला केला.
तसेच एनआयएने याप्रकरणात परबीरसिंग यांना आश्वासित केल्यानेच त्यांचे नाव या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या चार्जशीट मध्ये नसल्याचे सांगत परमबीर सिंग यांना वाचविण्यासाठीच अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले, परमबीरसिंग यांच्या माध्यमातून अनिल देशमुखांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
परमबीरसिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.
NIA ने जे चार्जशीट दाखल केले आहे. त्यामध्ये सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी ५ लाख रुपये माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी दिले होते असे सायबर एक्स्पर्टने सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.
NIA ने जी चार्जशीट दाखल केली आहे. त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांची चौकशी झाली नाही. त्यांना आरोपी करण्यात आले नाही. खंडणीसाठी हे सगळं कटकारस्थान सचिन वाझे याने केले. त्यात पूर्ण सत्य आहे असे आमचं मत नाही. बरचसं काही यातून बाहेर येऊ शकत होतं. परंतु NIA ने तसा काही तपास केला नाही. काही लोकांना वाचवण्यासाठी काम केले आहे. परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटी रूपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली होती. त्या पार्श्वभूमीवर परमबीर सिंग आणि अन्य एका महिला वकीलाने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत चौकशीची मागणी केली. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल न करता तपास करावा आणि त्यानंतर निर्णय घ्यावा असे आदेश दिले. त्यानुसार चौकशीला सुरुवात झाली. मात्र आतापर्यंत सीबीआयने फक्त अनिल देशमुख यांच्याच अनुषंगाने चौकशी केली. परंतु या चौकशीला परमबीर सिंग यांना एकदाही चौकशीला अद्याप बोलाविले नाही. याशिवाय ईडी, एनआयएनेही परमबीर सिंग यांना बोलाविले नाही. त्यामुळे यासंपूर्ण तपास प्रक्रियेवरच नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *