Breaking News

रामदास कदम यांचा सवाल- संबध काय, रोहित पवार म्हणाले, मी सांगतोय ना तो आमचाच

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या कामकाजातही उमटले. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार यांना भाजपाच्या आमदारांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याने थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवित काही धमकीवजा इशारे दिले. यावरून विधानसभेत राम कदम यांनी पाँईट ऑफ इन्फोर्मेशन अंतर्गत मुद्दा उपस्थित करत रोहित पवार यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावरून रोहित पवार यांनीही होय तो आमचाच कार्यकर्ता असल्याचे सभागृहाच्या बाहेर सांगत भाजपाच्या आरोपातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान भाजपाचे आमदार राम कदम यांनी पाँईट ऑफ इन्फोर्मेशन अंतर्गत योगेश सामंत याने एका सोशल मिडियाच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देत हे राज्य मराठ्यांचे असल्याचा गर्भित इशारा दिला. तसेच कितीही गुन्हे दाखल करा घाबरत नाही असे आव्हानही दिले. त्यावर पोलिसांनी योगेश सावंत यास अटक केली असता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा असल्याचे सांगत आहे. तर दुसऱ्याबाजूला कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे संबधित पोलिस अधिकाऱ्याला फोन करून सांगतात की त्याला सोडून द्या. या योगेश सावंत आणि रोहित पवार यांचा काय संबध, तसेच योगेश सावंत यांने कोणाच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांना धमकी का दिली असा सवाल करत याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

तसेच ज्याला अटक केली जाते त्या व्यक्तीचा पत्ता बारामतीचा निघतो यावरून या मागे बारामती कनेक्शन तर नाही ना असा सवाल यावेळी केला.

त्याचवेळी विरोधकांकडून त्यावर प्रतिप्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरुवातीला तालिका अध्यक्ष दिपक जाधव यांनी पॉईंट ऑफ इन्फोरमेशनवर बोलता येत नसल्याचे सांगत विरोधकांना बोलू दिले नाही. तसेच सदर प्रकरणी चौकशीचे आदेशही राज्य सरकारला दिले.

अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पॉईंट ऑफ प्रोसिजरचा मुद्दा उपस्थित करत राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सभागृहाचे सदस्य रोहित पवार यांना नावाच्या अनुषंगाने नोटीस दिली होती असा सवाल करत जर नोटीस दिली नसेल तर भाजपाच्या सदस्याने कशाच्या आधारे नाव घेतली असा सवाल केला.

त्यावर भाजपाचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, राम कदम यांनी योगेश सावंत यांचे नाव घेतले. मात्र शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केला नाही उलट त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असा उल्लेख केला आहे. तसेच त्या पक्षाचे आमदार पोलिस स्टेशनला कसे फोन करू शकतात असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे पोलिस स्टेशनला फोन करणाऱ्या आमदाराचा संबध काय आणि संबधित आरोपीचा त्या आमदाराशी संबध काय असा सवाल करत यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली.

त्यावर सभागृहात उपस्थित असलेल्या गृह मंत्री शंभूराज देसाई यांनी या चर्चेप्रकरणी सदस्यांनी जे जे मुद्दे उपस्थित केले. त्या सर्व मुद्याचा समावेश चौकशीत करून आणि अध्यक्षांनी दिलेल्या आदेशानुसार त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.

दरम्यान, रोहित पवार यांनी विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशीं बोलताना म्हणाले की, सभागृहात इतकी अॅक्टींग करायची गरज नव्हती. मी आताही सांगतोय योगेश सावंत हा आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. सभागृहात उपस्थित करण्यात आलेला प्रश्न हा फक्त फडणवीस यांना खुष करण्यासाठी विचारण्यात आल्याचा टोलाही यावेळी भाजपाच्या आमदारांना लगावला.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *